काव्य स्पंदन 02 राज्य स्तर
काव्य प्रकार भावगीत
विषय -- नाही देव देवळात
आहे तोच अंतरात, नाही देव देवळात
नका शोधू देवा-ह्यात ,वसला चरा चरात
कळी पहा उमलली सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना उषा हसत लाजली
सारी देवाची करणी घडवितो दिनरात
नका शोधू देवा-हात वसला चरा चरात 1
देता गरीबास अन्न , दोन आपुले कवळ
तृप्त होऊनी हसला आला असता जवळ
ओळखला नाही पण, तोची जेवला सुखात
नका शोधू देवा-हात वसला चरा चरात 2
पहा देवास कर्मात , कर्म घडवी देवत्व
सदा करिता सत्कर्म, मिळे आपणा महत्त्व
नको पूजा जप ताप ,देव वसे आपल्यात
नका शोधू देवा-हात वसला चरा चरात 3
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प स्वप्नगंध समूह
ओळ काव्य अष्टाक्षरी
*देव नाही देव्हा-यात*
सदा करावे सत्कर्म
देव वसतो कर्मात
तेथे असतो देवच
देव नसे देव्हा-यात
नको पूजा जप ताप ,
देव वसे आपल्यात
नका शोधू देव्हा-यात
वसला चरा चरात
देता गरीबास अन्न ,
दोन आपुले कवळ
तृप्त होऊनी हसला
आला असता जवळ
ओळखला नाही तया
तोची जेवला सुखात
नका शोधू देव्हा-यात
वसला चरा चरात
कळी पहा उमलली
सुगंधाने गंधाळली
वा- यासंगे डौलताना
उषा हसत लाजली
सारी देवाची करणी
घडवितो दिनरात
देव वसे तो फुलात
शोधा तया निसर्गात
वैशाली वर्तक
अभा स प सा समूह 2
उपक्रम 372
15/2/22
विषय - देह देवाचे मंदीर
*कर्मात देव*
जन्म दिधला देवाने
देह करी कर्मे सारी
वसतो तोची देहात
सदा कर्मे करावी न्यारी
देव वसतो कर्मात
सदा घडावे सत्कर्म
देव भेटे कर्मातुनी
हेची जीवनाचे मर्म
देता भुकेल्यास अन्न
उठविता पतितास
हसे तो निर्मळ भावे
बघतो आपणास
दडलेले दुधात लोणी
जरी नाही दिसत सहज
तसाच देव वसे देहात
सांगण्याची नसे गरज
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा