**जोखीम**
खर पहाता हे कामच नव्हे माझे
तरिही *जोखीम* उचललीच नेटाने
बघावा तरी एक करुनिया प्रयत्न
कसे ..कितपत , जमते आपणास
पण लिखाणास हवी लेखणी सुरेख
सुंदर अक्षरे कागदावरी उमटवेल
विचारांती शोधली , काळ्या शाईची पेन
"श्रीगणेश" लिहूनी आरंभ केला लिखाणास
पण , पुढे काय लिहावे ? तेच सुचेना
काय विषयावर लिहावे? तेही कळेना
शब्दगंध ग्रुपच , अंती आला कामास
निदान शब्द तरी मिळाला लिखाणास
यमक वृत्त साधण्याचा केला प्रयास
अंती चारोळीच लिहावी केला विचार
तरिही वर्ण संख्या न जुळे ओळीतून
पहिले पान , अखेरीस टाकले चुरगुळून
ठरविले शेवटी , लिहावे मुक्त छंदात
नसे यमकांचा खास त्रास तयात
तरिही विचार करुनी , लिहीलीच की!
अष्टाक्षरी , काव्यांजली अन् तरिही.....
लिहावयाची राहिली च की हो ....सुधाकरी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा