मंगळवार, २० सप्टेंबर, २०११
vach g ghu ma vachu mi kash?
वाच ग घुमा, वाचू मी कशी ?वाच ग घुमा वाच
वाच ग घुमा, वाचू मी कशी? वाच ग घुमा वाच.
बालपणी वाचली शालेय पुस्तकं ,
यौवनात वाचली स्टारडस न मासिकं
संगोपनात वाचली मुलांची पुस्तकं
वाचू मी कधी ?वाचू मी कशी?वाच ग घुमा वाच
सायंकाळ जाते मालिका पहाण्यात,
रात्री न पाहिलेल्या, दुपारी पहाण्यात,
इमेल वाचण्यात वा पत्ते लावण्यात
वाचू मी कधी? वाचू मी कशी? वाच ग घुमा वाच
समाजाचे वाचनालय आहे आज बंद,
ब्रिटीश लायब्ररीची मी नाही सदस्य ,
पुस्तकं आणू मी कशी ? वाचू मी कशी ?वाच ग घुमा वाच
नकोच वाटते ' ते ' पेपर वाचन ,
भरलेले नुसते हिंसा न राजकारण,
वारंवार दिसते हे तर "आजतक" वर ,
पेपर कशाला वाचू? वेळ कशाला दवडवू ?वाच ग घुमा वाच
वाचले पु. ल., व. पु .आणि वि. स.
वाचली विनोबांची गीता प्रवचन
वारंवार दिसते हे तर "आजतक" वर ,
पेपर कशाला वाचू? वेळ कशाला दवडवू ?वाच ग घुमा वाच
वाचले पु. ल., व. पु .आणि वि. स.
वाचली विनोबांची गीता प्रवचन
पण शेवटी सांगते ऐका,वाचा नित्य गीता,
त्यातच दडलीय जीवनाची सत्यता (सफलता )
वाच ग घुमा, वाचू मी कशी ? वाच ग घुमा वाच
*स्पर्धेसाठी*
स्वप्नगंध स्पर्धा समूह
विडंबन काव्य लेखन स्पर्धा
स्पर्धा क्रमांक 44
२\४\२४
विषय .. खोटे पुरस्कार
आदरणीय गीतकार बालकवी ठोंबरे यांची क्षमा मागून प्रयत्न करते
मूळ कविता. इकडे तिकडे चोहीकडे
आनंदी आनंद गडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे.|धृवपद||
कुठलेही असो मग ते , क्षेत्र
नसता अंगीच्या गुणास पात्र
नितीमत्तेची चाड कधी न नडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे. १
कोणी चोरीतो साहित्य कृती,
स्व-नावे देण्याची मनी न भिती.
सत्तेचा फायदा घेतात गडे,
इकडे तिकडे चोहीकडे,
खोटे पुरस्कार मिळवितात गडे. २
भुल पडे क्षणभर मनाला,
काल पर्यंत तर अजाण जगाला
रात्रभरात कसा गुणवंत घडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे. ३
सहज येतोच ना?, विचार मनी,
ख-या गुणी कलावंताचा त्या क्षणी.
किती भरले तयाने श्रमाचे घडे.
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे. ४
सत्तेचा फायदा घ्यावा तरी किती?
लाज लज्जा उरलीच न, जगती
गुणवंत असूनही मागे पडे
इकडे तिकडे चोहीकडे
खोटे पुरस्कार मिळवितात गडे. 5
वैशाली वर्तक
अहमदाबाद२\४\२४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा