चित्र काव्य
शब्द रजनी साहित्य समुह
स्पर्धे साठी
पूनम रात
रुप मोहक चंद्राचे
नभी दिसते सोनेरी
प्रतिबिंब ते जलाते
दिसे हसरे चंदेरी
अशा रम्य चांदरात्री
प्रेमी युगल रमले
भाव हळुच मनीचे
मुग्धपणे उमजले
भाषा प्रेमात मौनाची
नाही शब्दांची गरज
गुज एका मनीतून
दुजा कळले सहज
शांत नीरव जलाने
जणु ऐकली कहाणी
मंद लहरीत वाहून
गायली गोड गाणी
चंद्र होताच साक्षीला
मंद वाहिला पवन
वाटे प्रतिबिंब हसले
कोणी गायिले कवन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा