शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

11 )नारीलगत1 उंच भरारी आकाशी(अष्टाक्षरी)/2तू ही लढ/ 3 तू आहे म्हणून शान मुलगी घराची भ



काव्य स्पंदन  राज्य स्तरीय समूह 02
काव्य प्रकार -- अष्टाक्षरी
1  विषय -- उंच भरारी आकाशी
 
आहे तुझ्यात कर्तृत्व  
घेण्या नभात भरारी
दाव सामर्थ्य  जीवनी
राहो मनात उभारी

प्रगतीच्या  पथावर 
सदा ठेव तू पाऊल
पहा ती झळकतील 
देण्या यशाची चाहुल

सर्व  क्षेत्रात दिपावी
तुझ्या  उन्नतीची किर्ती
 मिळो तव प्रयत्नांना 
पूर्णपणे  स्वप्नपूर्ती

नवी स्वप्ने नवी दिशा 
कर विश्व पादाक्रांत
जगज्जेता तू होशील
हरण्याची नको भ्रांत

आहे मोकळे आकाश 
करुनिया ती हिंमत
घेता नभात भरारी
जगा कळेल किंमत

वैशाली वर्तक
***********************************************
उनाड वारा साहित्य  परिवार  आयोजित  भव्य राज्य स्तरीय 
काव्य लेखन स्पर्धा 
काव्य प्रकार  - षडाक्षरी
2 विषय --  तू ही  लढ

दाखव कर्तृत्व 
घेण्यास  भरारी
दाविण्या सामर्थ्य 
मनात उभारी                1

होईल प्रगती
उचल पाऊल
दिसेल खचित  
यशाची चाहुल           2

रंगव तू स्वप्ने   
विश्व पादाक्रांत
जिंकशील जग
नको मनी भ्रांत               3

मोकळे  आकाश 
दाखव हिंमत
घेताची भरारी
कळेल किंमत             4

सर्व क्षेत्री वाढो
उन्नतीची किर्ती
 तव प्रयत्नांची 
होवो  स्वप्नपूर्ती               5

आठव जिजाऊ
नाही तू अबला
लढ तू फक्तची
आहेस सबला                6

वैशाली वर्तक
******************************************
ती आहे म्हणून
************[][]

ती आहे म्हणून (सहाक्षरी)

 दोघेही मिळूनी
संसाराचा रथ
हाकती नेटाने
सदा अविरत 

तीच्या अस्तित्वात 
असे लक्ष्मी वास 
तिच्या मुळे घेतो
सुखाचे ते श्वास

ती करी संस्कार 
मुलांवर भारी
म्हणून म्हणती
जगाला उध्दारी

सण म्हणताच
तिच्या उत्साहानं 
भरे सारे घर
सदा आनंदानं 

करी नियोजन 
सर्वची कामाचे
देतसे घराला
रुप मंदीराचे

नसता घरात
वाटे रीतेपण
तीनेच दिधले 
घरा घरपण

सुखात दुःखात
सदा देई साथ
राहते जोडीला
घरुनिया हात

वैशाली वर्तक 
******************************************************
शब्दसेतू साहित्य  मंच आयोजित  उपक्रम 126
साहित्य   प्रकार चारोळी
4 विषय --तीचे अस्तित्व

तीचे अस्तित्व *अन्नपूर्णेचे*
कुटुंब जनांना वाटे हवे
करी रोजच व्यंजन
भोजनात ती नवे नवे


दोन कुळे उध्दारिते
वंशवेल सांगा कशी
तीचे अस्तिवच नसता
बहरेल का  हो  अशी.

पै पाहुण्यांचा करते आदर
किती रुपात वसे *गृहिणी*
चिंता करी सा-या घराची
कधी बहिण ,आई, वा वहिनी


आधुनिक गृहिणी तर
आहे शिक्षीत कर्तृत्ववान
संभाळुनी  ती घरपणाला
जगात मिळवे सन्मान .

 गृही नसता गृहिणी
घर भासे लगेच भकास
जाते घराची शोभा
 कुटुंबजन होती  उदास


वैशाली वर्तक 

*****************************


अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित सराव उपक्रम
षडाक्षरी काव्य
    4.    विषय --  सशस्त्र महिला
*****************************************

जात्याच महिला
असते गंभीर
 वेळ प्रसंगात
मनाने खंबीर       1


घरात भक्कम 
तिच्यावर भार
सशक्त महिला
घराचा आधार       2

येवोत संकटे
करिते ती पार
सहज उचले
कुटुंबाचा भार        3

आनंदे सोसते
किती तरी कष्ट
कधीच न लागो
 तिजला हो दृष्ट         4

आजी आई लेक
किती रुपे न्यारी
सा-याच असती
सशक्तच नारी         5

असे दोन चाके 
संसार रथाची  
सशक्त महिला
एक महत्त्वाची            6

वैशाली वर्तक




यारियाँ साहित्य  कला समूह
       5.    विषय -- जर ती नसती तर

संस्कृती ची परंपरा
लेक सोडूनी माहेर
सावरते दोन कुळ 
सासरला तो आहेर

दोन कुळे उध्दारिते
वंशवेल सांगा कशी
जर *ती* नसेल तर
बहरेल काहो अशी

जर *ती नसती तर* 
कोण दावी रुपे न्यारी
भार्या बहीण  वहिनी
माया ममतेची सारी

स्वतः करुनिया  कष्ट
कुटुंबाला सावरते
राहुनिया सदा व्यस्त
घरदार प्रकाशते

*ती जर नसती तर 
 करणार  कोण माया
 कोण दावेल जगास
कशी मिळे छत्र छाया


वैशाली वर्तक






भा सा व सां मंच भंडारा
      उपक्रम 
   6  विषय - महिमा तुझा

            नारी
      जिथे पूजनीय असे नारी
     वसते देव देवता तिथे सदा
     मिळे सतत सौख्य सुख तया
      थारा नसे तिथे दुःखास कदा

       विविध रुपात दिसते नारी
        आई,ताई,वहिनी ,भार्या, मावशी
        सदा वाहे ममता हृदयातूनी
        सर्वच रुपातील ती वाटे हवी हवीशी

          बहिणीची तर मायाच वेडी
          आई च्या सम ताई वाटे
           वहिनी  पण प्रेमळ सदा
          तिच्यासाठी मनीं आदर प्रेम दाटे

          आजी तर करुणेचा  सागर
          तिचे प्रेम सर्वात आगळे
          मायेची ऊब सदाच मिळे
          आजीचे प्रेम तर जगा वेगळे

           अशा विविध रुपातूनी
          नारी असते देवी समान
           तिच्या विणा अशक्य जीवन
          कधी न  करावा तिचा अवमान

  ....,,,,वैशाली वर्तक  
          अहमदाबाद



व्हिडीओ द्वारे स्वरचित कविता सादरी करण स्पर्धा
 7.     विषय - जन्म बाईचा


असती  दोघे समाएन
घड्याळ आणि बाई
अविरत गुंग कामात
नसे उसंत,...सदैव घाई

 दिसे  होता सकाळ
 तिजला स्वयंपाक घर
चहा दुध नास्ता जेवण
यादी कामाची तयार

करती प्रेमाने संगोपन  
आपल्या पाल्याला रिझवित
लक्ष असे  घड्याळ्यात
सारी कामे संभाळीत

घड्याळ काट्यांच्या तालावर
कामे करिते प्रत्येक नारी
वेळ पाहून कामाचा राडा
नारी खुशीत उचलते भारी


 धन्य तो जन्म बाईचा
सर्व क्षेत्रात  घेते भरारी
घर -दार मुले- कुटुंब
संभाळण्याची मनी उभारी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद








 8.       नव्या युगाची जननी



आदि काळापासूनची

काय वर्णावी महती

कधी नव्हती अबला

सर्व जग ची जाणती 


नाव चमकले जगी

जेथे टाकीते पाऊल  

 सर्व  क्षेत्रात  यशाची

  तुज लागते चाहुल


आहे  सशक्त महिला

अशा अनेक सबला

झाशी मर्दानी होतीच

नका संबोधु अबला


 पहा देवीच्या रुपात

 मन होते सदा दंग

 *नव्या युगाची जननी*

 आगळाच तुझा रंग

 

आहे तुझ्यात कर्तृत्व  

घेण्या नभात भरारी

 नव्या युगाची जननी

राहो मनात उभारी



प्रगतीच्या  पथावर 

सदा ठेव तू पाऊल

पहा ती झळकतील 

देण्या यशाची चाहुल


सर्व  क्षेत्रात दिपावी

तुझ्या  उन्नतीची किर्ती

 मिळो तव प्रयत्नांना 

पूर्णपणे  स्वप्नपूर्ती


नवी स्वप्ने नवी दिशा 

कर विश्व पादाक्रांत

जगज्जेता तू होशील

हरण्याची नको भ्रांत


आहे मोकळे आकाश 

करुनिया ती हिंमत

घेता नभात भरारी

जगा कळेल किंमत


वैशाली वर्तक

अहमदाबाद



सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम क्रमांक 546
ओळ काव्य
अष्टाक्षरी रचना
 9.    ओळ... शान घराची मुलगी
   शीर्षक..

कन्या असतेच अशी
शान असते घराची
करी विचार  सर्वांचा
वाटे  सदैव मानाची 

दोन कुळे उध्दारिते  
वंशवेल सांगा कशी
तीचे अस्तिव नसता
बहरेल का  हो  अशी
    
 मिळविते प्रेमळता     
 सिद्ध होते तालमीत   
भासे  कर्तृत्वाची मूर्ती. 
कन्या आईच्या कुशीत      

माहेराची शिकवण 
दोन कुळांना उध्दारी
दावी धडाडी संसारी
प्रेम भाव  घरी दारी

कन्या रत्न  जे आजचे
वसे विविध रुपात
भार्या वहिनी बहिण
शोभा आणते नात्यात 

भाग्यवान असे घर.  
जेथे वाजती पैंजण
कन्या असता सदनी
येते घरा घरपण
 
शान असता घराची
कन्यादान सोहळ्यात
परंपरा चालविता
पाणी येते नयनात 



वैशाली वर्तक
अहमदाबाद
............................................
स्पर्धेसाठी
स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित 
जागतिक महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धा
स्पर्धा क्रमांक 43
विषय.. स्त्री तेव्हाची -आताची
...................................................................
 10.    शीर्षक. *आधुनिक स्त्री*
..............................................

रांधा वाढा उष्टी काढा 
होते जीवन  कंठणे
स्व-मताला नसे मान
फक्त , घर  संभाळणे.  1

शिक्षणाची नसे मुभा.
सारी हुशारी घरात 
सावित्रीच्या धडाडीने
झाली शिक्षित जगात.  2

 उपलब्ध होता विद्या
झाली विदुषी जीवनी
प्रगल्भता  विवेकाने
घेते भरारी गगनी.         3
  
 जाण मनी कर्तव्याची
 सांभाळून घरदार
 झाली सामर्थ्याने जगी
आज  स्री कर्तबगार.       4

अर्थ शास्त्र पारंगत
उभी रहाते जोडीने
हक्क समानता प्राप्ती 
केली साध्य, तडजोडीने.   5


दूर केली अंधश्रद्धा
चालीरीती झुगारून
समाजाचे परिवर्तन 
मान स्त्रीत्वाचा राखून  6

आता घडला बदल
तिचे तेजस्वी अस्तित्व
हर क्षेत्री नाव मिळे 
 जाणा  स्त्रीशक्ती महत्त्व. 7

वैशाली वर्तक
अहमदाबाद





काव्ययोग काव्यसंस्था पुणे
महाराष्ट्र राज्य आयोजित
8 मार्च महिला दिनानिमित्त आयोजित
*स्पर्धेसाठी* 
विषय.    कलाकार एक स्त्री 
..............................................
शीर्षक..*सारे आकाश माझे**

कुटुंबाच्या इच्छापूर्तीसाठी
संसारात कष्ट झेलते
देऊनी स्वतःला झोकून
आकाश पण सहज पेलते

मायेचा  सागर हृदयी
ममतेची असे सदा छाया
कठीण प्रसंग  जराही  येता
तत्पर असे झिजवण्या काया

घरदार मुले कुटुंबियांना
सुखी करणे विचार  ध्यानी
 घडविणे संस्काराने शिल्प
हीच कल्पना  सदा मनीं

सीतारमण संरक्षण मंत्री
भुषविले स्त्रीनेच मंत्री पद
अशा असता एकएक  नारी
शोभत नाही अबला पालुपद

घेते उंच भरारी जीवनी
धारणा मनी *माझेच आकाश*
घालीन गवसणी नभात
दावीन नारी शक्तीचा प्रकाश

स्त्री शोभते नाना रूपात
मातृत्व पदी शिल्पकार
जगी घडविते पाल्याला 
असे *स्त्री एक कलाकार*


वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात)
8141427430




जाग रणचंडीके

 वेळआली नारीशक्ती जागृतीची
सज्ज  हो  तू प्रतिकाराला
नव्हती कधीच तू अबला
आठव तुझ्यातील  नारी शक्तीला

फोड वाचा  अन्यायाला 
अधमांना दे कर्माचे फळ
होऊनी रण चंडीका तूची
दाखव तयांना मनगटाचे बळ

आठव काळ, मर्दानी लक्ष्मीबाईंचा
शौर्य ,धैर्य  अन् पराक्रमाचा
घेऊनी  हाती , कर वार शस्त्राने
राक्षसी दानवी  त्या क्रूर कर्माचा

मात करण्या संकटावरी
स्व-रक्षणाचे घे तू धडे       
नराधमांचा अंत करण्या
तुझे बळ कधी कमी न पडे

जाण्या  सामोरे  नराधमांच्या
धैर्याचे  ठेव सदा हत्यार
नकोच ती , कधी म्यानात
आत्मविश्वासाची तळपती तलवार

आदी काळातील तुझीच रुपे
 आठव दुर्गा ,काली , अंबिके
करण्या  दृष्टांचा संहार 
जागी हो , तू रणचंडीके

वैशाली वर्तक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...