सौदामिनी
लगागा लगागा लगागा लगा
जरी तू रहातो सदा पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी
कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी
कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी
कितीही झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा सदा अंतरी
जरी ही निघाली पिके ती बरी
भुकेलाच राही सदा तो तरी
अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी
वैशाली वर्तक
सौदामिनी
लगागा लगागा लगागा लगा
जरी धाम देवा तुझे पंढरी
पहातो तुला मी सदा अंतरी
कधी ऐकतो मी तुझी बासरी
पहातो सदाची अदा हासरी
कशाला बसावे सदा मंदिरी
खरा देव पहावा शिवारी तरी
कितीही झिजतो शिवारी तरी
जलाची अपेक्षा सदा अंतरी
शिवारे बहरली बळीची जरी
तरी पोर पत्नी उपाशी घरी
अशी ती कहाणी बळीची खरी
नशीबी सुखाची नसे भाकरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
शेतकरी दादा
24/5/21
शेतकरी दादा
येता कृष्ण मेघ नभी
बळीराजा येतो मनी
झटकूनी आळसाला
शेतकरी उभा झणी
काळ्या मातीला कसूनी
करी शिवार तयार
वाट पहाती लोचने
मृग पावसाची फार
मृग धारा बरसता
तृप्त होते काळी माय
कृपा होता वरुणाची
शेतकरी मागे काय
शोभिवंत भासे शेत
मोती जणू कणसात
देवाजीच्या प्रसादाने
सुख येते शिवारात
पीक येता भरघोस
मोल मिळते कष्टाचे
दिसे दारी धान्य रास
दिन येती आनंदाचे
जीवनात कष्ट फार
देश हा कृषीप्रधान
काम बळीचे महान
पोशिंद्याचा जगी मान
वैशाली वर्तक
पडले मृगाचे पाणी
अंकुरले बीज फोफावूनी
मनीं आनंदिला राजा-बळी
रंगविली स्वन्पे मनातूनी
वा-यावर डौलती चहूकडे
शिवारे हिरवी आखीव
पाहता वाढली जोमाने
सुंदर दिसती रेखीव
पण वरुणराजा कोपला
पाणी नाहीच बरसल
सारे पीक कोमेजल
हाती काहीच न गवसल
सुकले ओढे, सा-या नद्या
गुरांना पण न मिळे चारा
काळी भूभी भेगाळली
जीवाला कसा मिळेल थारा
बियाणाचे चढे कर्ज माथी
बळीराजा कसा होईल!सुखी
कणभर दाणा नसे
घरी तयाचे जीवन झाले दुखी
रब्बीची कराया पेरणी
पाणी आता येई डोळा
कसे होणार आता चिंतेने
दुष्काळ दिसे सर्वत्र काळा
असे ह्या वरुण राजाने
न देता दिन सुकाळाचे
करूनीया कोप मातीवर
दाविले दिन दुष्काळाचे .
.
कधी येशी अवचित
कष्टी होई बळी मनी
जाते वाहूनी हातचे
दुःखी होई क्षणोक्षणी
.....
वैशाली वर्तक
स्वराज्य लेखणी मंच
आयोजित उपक्रम
विषय.. उन्हाचे चांदणे व्हावे
**कष्टाचे मोल*
काळ्या मातीला कसून
घाम गाळीतो शिवारी
परिश्रम घेतो सदा
पहाण्यास राशी दारी
वाट पाहतो जलाची
बरसण्या मृग धारा
करण्यास पेरणीला
सोसतो गर्म वारा
येता वेळेवर वर्षां
पहा माती अंकुरली
पाहुनीया बीजांकुरे
बळी मने संतोषली
जसा पडता पाऊस
रोपे वाढली जोमाने
झाले उन्हाचे चांदणे
मन डोले आनंदाने
येता दिन ते सुगीचे
भासे उन्हाचे चांदणे
कष्ट आलेत फळाला
हेची देवास सांगणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भा म सा प पुणेपश्चिम महाराष्ट्र
चित्र वरुन काव्य लेखन
बळीराजा
दिन रात करी कष्ट
असो पाऊस वा ऊन
महेनत करी सदैव
काळ्या मातीला कसून
येता अंबरात मेघ
करी शिवार तयार
घाम गाळून मातीत
केली कष्ट अती फार
आहे पोशिंदा जगाचा
हवी कृपा वरुणाची
त्याच्या कष्टे मिळे भाकर
जाण ठेवूया कष्टाची
नका करू अन्नाचा व्यय
हवे तेवढे घ्यावे पानी
गरजूंना द्यावे अन्न
कष्ट ठेवू बळीचे ध्यानी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा