बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

९ घट स्थापना ब्रह्मचारीणी !चंद्र घंटा ! कुष्मांडा !स्कंदमाताकात्यायनी कालरात्री

नवरात्री महा स्पर्धा



मनस्पर्शी साहित्य परिवार
साप्ताहिक उपक्रम
दि....३/१०/२०२४
सदर.... अंतर्मन
पुष्प क्रमांक....०३
शीर्षक.... शैलपुत्री


पहिली दुर्गा शैलपुत्री
मुलगी हिमालयाची
करती सारे पूजाअर्चा
मनोभावे या रूपाची.....

पूर्वजन्मी दक्ष कन्यका
नाव होते तिचे सती
वरले तिने श्रीशंकरांना
मानून आपले पती....

पार्वती अन् हेमवती
आहेत तिचीच नावे
दिव्य साध्वी पतिव्रता
सकलांनाच  ठावे.....

उजव्या हाती त्रिशूळ
वामकरात  कमळ
करती जागर भक्तीचा
घालुनिया  गोंधळ....

करती सारे संत महंत
सुरवात योगसाधनाला
बसून मूलाधार चक्रात
ठेवते स्थिर मनाला.....


सौ. मेधा घोंगे. 👏✒️
नागपूर.




शब्दरजनी साहित्य समुह आयोजित 
स्पर्धेसाठी
घटस्थापना

संपताच पितृपक्ष
आले नवरात्र समीप
शुध्द अश्विन प्रतिपदेला
तेजाळूया नंदादीप

शरद ऋतूच्या आरंभी 
वदती तया शारदीय
 दिन पहिला उजवुया
आली देवी वंदनीय

केली तयारी गृहिणींनी
पेरुनीया धान्य सात
फूल माळ अखंड दिवा
 लावुनिया हातो हात


हर्षभरे  झाले स्वागत 
झाली घटस्थापना घरोघरी 
धूप  दीप पुष्पे सुगंधी
प्रसन्नता दिसे क्षणभरी


नव दिवसांची नवरात्री
करतील देवीचा जागर
सौख्य आनंदे भरेल 
येता भक्तीरसाचा सागर

वैशाली वर्तक

=========================================_
स्वप्नगंध साहित्य समूह
आयोजित उपक्रम क्रमांक२
देवी.. ब्रह्मचारिणी पंचाक्षरी 
दुसरी माळ

नवरात्रीत
दुसरे दिनी
रूप दुर्गेचे
ब्रह्मचारिणी. 

असे स्वरुपी
ब्रह्मचारिणी
ती ज्योतिर्मय
तपश्चारिणी 

त्याग, वैराग्य
संयम, तप
होई प्राप्तता
करीता जप

प्रसादासाठी
ठेवू साखर
मिळे दिर्घायु
ते कणखर

नित्य करिता
मंत्र पठण 
होतात दूर
कष्ट सकळ

रुप देवीचे
पाहून मना
मिळे चित्ताला
आनंद जना

वैशाली वर्तक
अहमदाबाद

===============================================
स्वप्नगंध साहित्य समूह
आयोजित नवरात्री विषेश उपक्रम क्रमांक 3
विषय... देवी चंद्र घंटा

तिस-या दिवशी
करुया वंदन
माता दुर्गा रुपे
मातेचे स्मरण

अर्ध चंद्र घंटा
भाळी शोभतसे
नाव चंद्रघंटा
तीज वदतसे

सूर्य तेज रुपी
शोभनीय कांती
होता कृपादृष्टी
न उरते भ्रांती

अस्त्र शस्त्र हाती
दशभुजा धारी
संकट निवारी
दुष्टांना संहारी

महिषासुराचा
करण्यास नाश
दिले अस्त्र शस्त्र
केलाची विनाश

जगाच्या कल्याणा
घेतले हे रुप
आयुधे धरुनी
भक्तीचे स्वरूप

करु उपासना
 मिळते धैर्यता
संकट टाळण्या
भय निर्भयता.

वैशाली वर्तक
अहमदाबाद


=============================================

स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित
नवरात्र विशेष उपक्रम क्रमांक 4
देवी    कुष्मांडा

मान आहे कुष्मांडाला
 सृष्टी करण्या  निर्माण 
  केली ब्रह्मांड  उत्पती 
  ऊर्जा निर्मितीचा मान
  
कुष्मांडाचे ते स्वरूप.     
भरलेय कोहळ्यात
सृष्टी निर्मितीचे काम
बीज रुपे आकारात.
  
ओळखती अष्टभुजा
सर्व सिद्धि होती प्राप्त 
 ठेवू मंत्र स्मरणात
 व्याधीतून होऊ मुक्त
   
 वसे सूर्य मंडळात
 माता कुष्मांडाचा वास
शक्ती क्षमता अपार
कांती सूर्यसम खास

करू मातेचे स्मरण
भक्ती भावे उपासना 
मिळण्यास सुख शांती
दु:ख सारण्या प्रार्थना 

वैशाली वर्तक
अहमदाबाद
==============================================
स्वप्नगंध साहित्य समूह आयोजित
नवरात्री विशेष उपक्रम क्रमांक 5
देवी.. स्कंदमाता
भक्ती गीत
रंग पिवळा
        करु जयजयकार 
नवरात्री पर्वात ,पंचम दिनी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी   |धृवपद|

चतुर्भुजा नावे पण, संबोधती
मांडीवर कार्तिकेय विराजती
जयजयकार करु क्षणोक्षणी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी...१

मनोवांच्छित पूर्ण करी कामना
संतान प्राप्ती होण्यास आराधना
मातेला करू भक्तीची विनवणी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी.  २

नैवेद्यास अर्पूनिया केळ फळ
मिळते शक्ती युक्ती बुद्धीला बळ
शरणी जाऊया  मातेच्या चरणी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी.  ३

चतुर्भुजा बैसुनिया सिंहावरी
असे निवास तिचा गिरीकंदरी 
माया ममतेची असे ती जननी
स्मरुया स्कंदमातेला मनोमनी    ४

वैशाली वर्तक
अहमदाबाद

=============================================

स्वप्नगंध साहित्य समूह
आयोजित नवरात्री विशेष उपक्रम
मुक्तछंद काव्यरचना
विषय.. कात्यायनी
माळ सहावी
रंग ..हिरवा

कत नावे महर्षी प्रसिद्ध
कात्य  त्यांचा होता पूत्र
झाला याच कात्य गोत्रात
जन्मला कात्यायन महान
केली कठोर तपस्या  भगवतीची
 पावली भगवती  जन्म  घेऊनी 
करण्या दैत्यांचा संहार जगती.
पृथ्वीवर वाढला महिषासुराचा त्रास
ब्रह्मा विष्णू महेशांनी दिली ऊर्जा
नाश करण्या दैत्यांचा
कात्यायन ने केली प्रथम पूजा
नाव भगवतीचे जाहले कात्यायनी
चतुर्भुजा असती तिजला
अभय मुद्रा , वर दायीनी मुद्रा
एकहाती कमळ पुष्प, दुजे  ते शस्त्र
तेज झळके मुखावर 
सूवर्णमय कांती तिची
साधक करीती उपासना
प्राप्त होण्या अर्थ, काम, धर्म, मोक्ष
आराधना करीता
 लोप पावे दु:ख दारिद्र्य
देवी कात्यायनी कृपेने

वैशाली वर्तक
अहमदाबाद
===================================================
स्वप्न गंध साहित्य समूह
आयोजित नवरात्री विषेश उपक्रम
काव्य प्रकार.  काव्य प्रणाली 
सातवी माळ
देवी. कालरात्री

नवरात्र पर्वातील रुप
रूप खूपच क्रोधित 
क्रोधाने श्वासात अग्नी 
अग्नीमूळे  मन भयभीत  १

नवरात्रीचा  सातवा दिन
दिनी करुया पूजन
पूजा  अर्चना  करूया
करु कालरात्रीला वंदन   २

चार भुजा धारी असे देवी 
देवीचा सदैव हात
हात वरदानासाठी 
वर देता अभयाची साथ.  ३

त्रीनेत्र  कालरात्री देवीला
देवीला  वाहू अक्षता   
अक्षता संगे सुमने . 
सु- मने मिळे मना शांतता 

वैशाली अविनाश वर्तक
=======================================================
स्वप्न गंध साहित्य समूह आयोजित नवरात्री विशेष उपक्रम क्रमांक ८
 आठोळी लेखन
देवी.. महागौरी

     
महागौरी   गौरवर्णी
आरुढली बैलावरी. 
 वृषारुधा संबोधती
शुध्द शांत भाव अंतरी

कन्या पुजेचा दिवस
महागौरी रुपे आज
चतुर्भूजा कुमारिका
जांभळा चैतन्य साज

वैशाली वर्तक
अहमदाबाद


========================================================

स्वप्न गंध बंद समूह
आयोजित नवरात्री विशेष 
उपक्रम क्रमांक ९
देवी    सिध्दिदात्री
नवमी माळ 
रंग मोरपंखी


सिद्धिदात्री असे नववे दुर्गामातेचे स्वरूप 
सर्व अष्ट सिध्दीचे तेज झळाळणारे रुप.  

 देवीच्याच कृपेने शकरांना  प्राप्त सिध्दी 
  शिवशंकरांना अर्धंनारीश्वरची प्रसिद्धी

कमळावर देवी जाहल्या विराजमान
चतुर्भुजा सिध्दिदात्रीत सरस्वतीचा मान

हाती शंख ,चक्र ,गदा, सुदर्शन, कमळ
शांतसोज्ज्वळ भाव भासती सदा निर्मळ 

नवरात्री नवव्या दिनी भक्त करी पूजन
 विद्या अष्टसिद्धी प्राप्तीसाठी मंत्र पठण.

याच दिनी कन्याचेही  करिती पूजन
मोरपंखी रंगातील देवीचे  स्मरण

वैशाली वर्तक
अहमदाबाद
काव्यपुष्प समूह 
अभंग 
नवरात्री शारदीय 
२४\१०\२३

येता नवरात्री | देवीचा जागर. | 
भक्तीचा सागर | घरोघरी. ||. १

सुमनाच्या माळा |  तेजाळती दीप |
 देवीच्या समीप   | नऊदिन.    ||२

देवी आगमना ।   करीती  तयारी । 
  मनास उभारी  । तूची देशी ।। ३

आनंदे उत्साहे |   गरबा खेळती   
देवीचीमहती    |.    वर्णताती.  ४


दैत्यांच्या संहारा | देवीचा आधार  |
   उचलला भार | जगताचा

देवी ठेव कृपा   ।  तुजला सांगणे  । 
नुरते मागणे     ।  तुजलागी  ।। ६

मज अभय दे  ।  मजला दे शक्ती । 
करीन मी भक्ती । नित्यनेमे  ।।  ७

सहवासे तुझ्या  ।  जागतो विश्वास । 
लागलाची  ध्यास  । अंतरंगी  ।। ८




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...