शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०

ओढ कर्तव्याची

काव्य स्पंदन राज्य स्तरीय समुह 02
दैनिक उपक्रम 
काव्य प्रकार  -- दशाक्षरी
विषय - कर्तव्याची ओढ

माता पिता करिती संस्कार 
बालपणी प्रेमे पाल्यावर
असे ओढ त्यांना कर्तव्याची
घडविण्या  आत्म बलावर             1

तीच ओढ हवी कर्तव्याची
  भविष्यात ठेवुनिया  मनी
व्हावे पाल्यांनी आधार काठी
द्यावी प्रेमळ छाया जीवनी               2

असते सैनिकांना जाणीव 
रहाताती कर्तव्यात दक्ष
देश प्रेम हृदयात सदा  
देश रक्षणात त्याचे लक्ष              3 

गुरुंना मान असे देवाचा
नाते गुरु शिष्याचे महान
ओढ मनी सदा कर्तव्याची
म्हणूनच जगी त्यांचा मान              4

सर्व  सफाई कामगारांनी
जराही न दावीली उणीव
संकट कोरोना देशावर
दाविली कर्तव्याची जाणीव             5

नागरिकांना  हवी ती ओढ 
स्वसुरक्षिते च्या  बंधनाची
 करण्या देश  कोरोना मुक्त
कर्तव्ये पाळू सरकारची                    6

वैशाली वर्तक
अहमदाबाद (गुजरात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...