शब्द दरवळ साहित्य समुह आयोजित
अष्टाक्षरी काव्य स्पर्धा
विषय - पेरणी
काळ्या शार भुईवर
चाले नांगर जोमात
काळ्या मातीला कसून
बळी करे सुरुवात
मोद भरे शेतकरी
लगबग करी आता
पडे थेंब पावसाचे
पेरणीची वेळ येता
मृग नक्षत्र पाण्याने
बीज अंकुर फुटेल
कोंब डोकावून पाही
मन आनंदे भरेल
पीक येईल शेतात
शेत दिसेल हरित
मिळणार मोती छान
फळो कष्टाचे फलित
देवा तुजला स्मरून
केली बियांची पेरणी
फुलू दे रे शेत माझे
सदा नमतो चरणी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
गुजरात
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा