मंगळवार, ३० जून, २०२०

पंचाक्षरी आषाढ घन

स्पर्धेसाठी
विषय ... आषाढ घन

दाटले घन
आतूर मन
बरसण्याने
भिजले तन

सुटला वारा
पडल्या गारा
आषाढ मासी
सतत धारा

निर्मल झरा
वाहतो खरा
आषाढ घन
वेगळी त-हा


ऋतु हिरवा
वाटे बरवा
घन बरसे
देई गारवा


मिळे आनंद
फिरा स्वच्छंद
आषाढ घनी
परमानंद

मेघ रंगले
चित्त दंगले
आषाढ घनी
 गान स्फुरले

नभ दाटले
मन हर्षले
मनोमनीते
गीत गायले


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...