मंगळवार, ३० जून, २०२०

अष्टाक्षरी विरहाचे दाट धुके

उपक्रम   अष्टाक्षरी  विरहाचे दाट धुके
 ओळ-विरहाचे दाट धुके
       **असह्य विरह**

पहा झाल्या धुंद दिशा
पानोपानी प्रीत झुरे
हृदयात शोधुनिया
 सदा मम ऊर भरे

सांगु शके ना कुणाला
गुज माझे हे मनीचे
कसा साहु विरह हा
भाव जाण अंतरीचे

रात वाटे सदा वैरीण
मनी आठवे ती भेट
कशी विसरु मी रात
स्मरणात असे थेट


तव संगे पाहिलीत
  हात  घेउनी हातात
रंगविली होती स्वप्ने
सांगितली एकांतात


आठवात त्या भिजले
झाली अंधुकशी वाट
अश्रूं नयनी वाहता
धुके विरहाचे दाट

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...