सोमवार, २९ जून, २०२०

प्रतिक्षा बळीराजाची


प्रतिक्षा बळीराजाची


झळा उन्हाच्या साहूनी
धरा पहा भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली

वाट पाही बळीराजा
काळ्या मेघांना पाहूनी
नजरेत दिसे प्रतिक्षा
वरुणाला विनवूनी

कष्ट करुनी उन्हात
काळ्या मातीला कसीन
नांगरुन काळी माय
घाम तयात गाळीन

पाणी पडावे मृगाचे
बीज अंकुरे फुटावी
कोंब डोकवेल वर
मने आनंदे भरावी

चारा मिळावा गुरांना
मोल मिळावे कष्टाचे
दिसो दारी धान्य रास
संपवावे दिन प्रतिक्षेचे

करितोय विनवणी
मान द्यावा प्रतिक्षेला
बरसून शिवारात
पूरी करा मनीच्छेला
वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...