सोमवार, २९ जून, २०२०

क्षण निवांत सांजेचा

यारिया साहित्य कला
अष्टाक्षरी काव्य रचना
विषय - क्षण निवांत सांजेचा

सांजवेळी सय येते
प्रत्येकास स्वगृहाची
जेथे मिळे मनःशांती
भेट होता स्वजनांची

वाट पाहती बालके
रंगलेली खेळण्यात
दारी उभी गृहलक्ष्मी
होई क्षणी आनंदात

तेजाळते सांजवात
करी मना प्रफुल्लित
शांत प्रसन्नता भासे
घर होई उल्हासित

शब्द गुंजताती कानी
रामरक्षा पठणाचे
क्षण निवांत सांजेचा
मनशांती मिळण्याचे

करुनिया गुज गोष्टी
घेउनिया हाती हात
मिळे मोद क्षणभर
मन रमे आठवात

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...