रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

जीवनातील कवितेचे महत्व

जीवनातील कवितेचे महत्त्व

तीन अंकी नाटक
म्हणती जीवन जसे
आनंद तयात भरण्या
कवितेचे स्थान असे
     भाव दावी मनीचे सदा
      असे अपुल्या मनाचे  दर्पण
       नव रसाचे ती भरभरुनी
      सहज घडविते ती दर्शन
लहान बालकास रिझवण्या
कविताच  येते ओठी
गाता गेय करुनी कविता
तयास वाटे गंमत मोठी
       भक्ती रसाने ओतप्रत
       भरली असता कविता
       देते शांती मनास सदा
        दावे मंगल प्रसन्नता 
  येता कधी प्रसंग  बाका
  जागृती करी जन मनात
 रचिता  वीर रस काव्य
 देती स्फुरण जवानात
        सदा विहरते प्रेमी जनात
        दावीत रोमांचित भाव
        होई उत्कट  प्रेम मनीचे
         घेण्या एक दुजांचा ठाव
   नव रस संपन्न   असे भाव
   चित्रीत करण्यात तिचे श्रेष्ठत्व
    रंगवीते मानवी जीवन सदा
   म्हणून तीचे  जीवनी महत्व
   
वैशाली वर्तक....19/10/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...