सोमवार, २१ ऑक्टोबर, २०१९

बडबड गीत ...गणपती


साहित्य कला यात्री महाराष्ट्र आयोजित
राज्य स्तरिय काव्य स्पर्धा स्पर्धा क्रमांक ६
विषय ---गणपती बडबड गीत

गणपती बाप्पा तुम्ही येताच घरी
आम्हा मुलांची होई मौजच भारी
सांगतो बाप्पा तुम्हाला गोष्टी चार
करा मनी त्याचा, तुम्ही च विचार

पोट पहा तुमचे , किती भले मोठे
ऐका तुम्ही जरा कधी,आईचे म्हणणे
बरे नसते कधीच इतके गोड खाणे
सांगतो मी तुम्हा ,ऐका तिच सांगणे

समजत नाही हो बाप्पा मजला
वहान तुमचे मुषक किती ते लहान
त्यावर बसणे, हे अवघडच काम !
त्यात तुमची काया आहे अतीच महान 

वर्षातून एकदाच का येता तुम्ही?
रोज रोज या ना मिळेल आम्हा सुट्टी
गोड धोड खाण्याची चंगळ न् मस्ती
मिळे अभ्यासास तर रोजच बूट्टी.

जाणार ना आता तुम्ही आमुच्या घरून
पण विचारांने माजेल मनी काहूर
विसर्जनाच्या आरतीला येईल मन भरुन
सुने होईल घर , मनी लागेल हूर हूर ....

वैशाली वर्तक.



यारिया साहित्य  कला समूह आयोजित 
उपक्रम
विषय - सर्वांचे आवडते  गणू बाप्पा

 शीर्षक -- गणपतीबाप्पा

गणपती बाप्पा
असे आवडता
तूच तरआहे
संकटांचा हर्ता

तुझ्या चरणाशी
आलो मी शरण
कर आता तूची
दुःख निवारण

भयभीत झाले 
अवघेची जन
करी विनवणी
कष्टी त्यांचे मन

मुलांचा तू बाप्पा
तूची बुध्दी  दाता
मागणे तुजला
सुखी कर आता

रुप पाहुनिया
मन झाले शांत
तूच सुखकर्ता
नको मनी भ्रांत

दिन चतुर्थीचा
घेऊया दर्शन
द्यावे वरदान
करिता वंदन


वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...