मी आणि माझी कविता
छंद मजला कवितेचा
तोचि विरंगुळा मनाचा
काही विचार येता मनी
त्वरित झरे माझी लेखणी
विषय असो कुठलाही
काय लिहू हा प्रश्न नाही
गळून पडणारे पान पाहून
सहज सूचते काव्य मनातून
फुले पाहताच क्षणात
तोचि विरंगुळा मनाचा
काही विचार येता मनी
त्वरित झरे माझी लेखणी
विषय असो कुठलाही
काय लिहू हा प्रश्न नाही
गळून पडणारे पान पाहून
सहज सूचते काव्य मनातून
फुले पाहताच क्षणात
येतात विचार ते मनात
रांगेत तारेवर पक्षांचे बसणे
सहज शब्दांचे मनात तरंग उठणे
माझी अन कवितेची गट्टी
होणार नाही कधी तिच्याशी कट्टी
रांगेत तारेवर पक्षांचे बसणे
सहज शब्दांचे मनात तरंग उठणे
माझी अन कवितेची गट्टी
होणार नाही कधी तिच्याशी कट्टी
.
मी कविता
अ भा म सा प समूह 2
आयोजित
उपक्रम काव्य लेखन
विषय - मी कविता
आहे मी मनीचे गुज
दावीते मम रूप
लेखणीच्या साहाय्याने
भावते जनाना खूप
शब्द झरता काव्यातून
समजते कवी मन
कधी हास्य कधी मोद
आनंदीत होती जन
उत्तेजन प्रेरणा देते मनास
वाढे चैतन्य बळ मानसिक
कदापि न होण्या निराश
बदल घडविते सामाजिक
कधी दाविते रम्य निसर्ग
वाहून शब्द रुपे झरा
डौलणारी रान फुले
निसर्गाचा आनंद खरा
रमते कधी भक्ती भावात
ठेवा दृढ विश्वास देवावर
तोची कर्ता करविता
सांगते , तोची आहे विश्वंभर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा