मोहरली लेखणी
विषय--माझी लेक माझा आभिमान
विषय--माझी लेक माझा आभिमान
जीवनात होती सुप्त मनीच्छा
असावी एक लेक या जीवनात
केली पूर्ण देवाने ती खरी
देउन कन्या रत्न मम पदरात
असावी एक लेक या जीवनात
केली पूर्ण देवाने ती खरी
देउन कन्या रत्न मम पदरात
वाढली घेऊन उत्तम संस्कार
घडविले उज्वल भवितव्य जिने
शिकून सवरुन जाता सासरी
दोन्ही ही कुळे उजळविली तिने
घडविले उज्वल भवितव्य जिने
शिकून सवरुन जाता सासरी
दोन्ही ही कुळे उजळविली तिने
मान तिजला दोन्ही ही घरी
मम हृदय भरे अभिमानाने
बोट दाखविण्या जागाच नुरे
हर क्षेत्रातील धवधवीत यशाने.
मम हृदय भरे अभिमानाने
बोट दाखविण्या जागाच नुरे
हर क्षेत्रातील धवधवीत यशाने.
अशी माझी लेक बहुगुणी
मिळो तिला यश समृद्ध जीवनी
झाड माहेराचे लाविले तीज साठी
आनंदी रहाण्यास देईल संजीवनी
मिळो तिला यश समृद्ध जीवनी
झाड माहेराचे लाविले तीज साठी
आनंदी रहाण्यास देईल संजीवनी
वैशाली वर्तक 11/10/2019
लेक ती भाग्याची !आहे माझी परी!
माया तिच्या घरी ! सदोदित
लक्ष्मी घ्या पावले! लेक ती मानाची!
शान ती घराची ! सदा साठी
बोलणे मधाळ ! गोड तिचा गळा!
आनंद सोहळा! पुरविते!
उजळली कुळ! माहेरसासर!
प्रे याची घागर! सर्वांसाठी
जिकुनिया मने!सासरी लाडकी!
स्वभावे बोलकी ! लेक माझी
माझ्या कन्या रत्ने!हीच भाग्यवान!
वाटे वरदान! माझे मला
माझ्या. कन्या रत्ने !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा