शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१९

कविता ... वेदना कवितेची

उपक्रम
वेदना कवितेची

धन्य  झाले  आनंदाने
देता पूर्ण  रूप कवितेला
पण त्या कवितेला विचारा
किती कष्ट झाले तिजला

इथून तिथून जुळवून शब्दांना
मांडला होता तयांचा खेळ
चाळणी करिता शब्दांची
तेव्हा कुठे जुळला मेळ

वाटते तितके नसे सोपे
शब्द शब्द जोडत जाणे
करिता छेद विच्छेद शब्दांचे
तेव्हा कुठे ओळ जुळणे

नको करु खंत कविते
साहित्यात तुझे सदा श्रेष्ठत्व
शब्दांच्या ओघातून स्फुरणे
सर्वची जाणिती तुझे महत्व

वैशाली वर्तक   18/10/2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...