१ अशी असावी कविता
कविता हवी सुपा समान
म्हणजे सार सार ग्रहण करणार
बाकी नको फाकट पसारा
थोडक्यात गहन अर्थ सांगणार
कमी शब्दात भाव दर्शन
मुक्त छंदात भाव ऊमजे
पण करण्या गेय कविता
यमक हे सदा ची पाहिजे
जुन्या ओव्यात शब्द साधे
पण जीवन सार तयात
कविता असावी हळुवार
अलवार शब्दांत भावना पहात
करुण ,हास्य ,वेदना
शौर्य वा भक्ती रस पूर्ण
नवरस भाव दावणारी
कविता भासे नित्य नवी
साधे असता मनाचे श्लोक
साध्या शब्दात बोध मनास
नित्य निरंतर ओठी येते ओवी
मनाचा ठाव घेण्यास जनास
वैशाली वर्तक
मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे
देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना
सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची
वैशाली वर्तक
कविता हवी सुपा समान
म्हणजे सार सार ग्रहण करणार
बाकी नको फाकट पसारा
थोडक्यात गहन अर्थ सांगणार
कमी शब्दात भाव दर्शन
मुक्त छंदात भाव ऊमजे
पण करण्या गेय कविता
यमक हे सदा ची पाहिजे
जुन्या ओव्यात शब्द साधे
पण जीवन सार तयात
कविता असावी हळुवार
अलवार शब्दांत भावना पहात
करुण ,हास्य ,वेदना
शौर्य वा भक्ती रस पूर्ण
नवरस भाव दावणारी
कविता भासे नित्य नवी
साधे असता मनाचे श्लोक
साध्या शब्दात बोध मनास
नित्य निरंतर ओठी येते ओवी
मनाचा ठाव घेण्यास जनास
वैशाली वर्तक
************************
महाराष्ट्र साहित्य सुगंध
२ विषय - कवितेचा गाव
**********************
येता सहज विचार
कवितेचे वसे गाव
असे ते सदा वेगळे
कवी मनी घेता ठाव
झरतात शब्द जेव्हा
कवी हृदयाचे भाव
नांदी नवरस येथे
दावी अंतरीचा ठाव
वाहे भावनांची नदी
कवितेच्या गावातूनी
जसे भाव उमटती
वाहे त्या रसा तूनी
भाव दाविते शौर्याचे
स्फूर्ती देण्या सैनिकास
तर भक्ती रस भाव
दिसे भोळ्या त्या भक्तास
कवितेचा गाव पहा
देतो आनंद मनास
मनी न राखता खंत
करी उत्साहीजनास
वैशाली वर्तक
सावली प्रकाशन समूह
*उपक्रमासाठी*
अष्टाक्षरी काव्य प्रकार
विषय -३ कशी आसावी कविता
*भाव करी प्रगट*
साध्या सरळ शब्दात
हवी सदा हळुवार
सहजच उमलता
भाव दावी अलवार
नको उगाच शब्दांचा
अस्ताव्यस्त तो पसारा
शब्द मोजके सांगती
अर्थ कवितेचा सारा
भाव सकारात्मक ते
हवे वहाते काव्यात
देई आधार जगण्या
रूचे सदा वाचण्यात
हवे प्रेरणा देणारे
जवानास देण्या स्फूर्ती
मनोबल वाढवून
भाव दावी देश भक्ती
*अशी असावी कविता*
सहजच गमे मना
असे भाव दावणारी
स्मरणात राही जना
दावी सोप्या शब्दातून
भाव मनीचे उत्कट
*अशी असता कविता*
भाव होतात प्रगट
वैशाली वर्तक
अहमदाबाद 21/3/22
४ माझे लेखन
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते मी शारदेचे वरदान
सहज घडते लिखाण
जसा मिळता विषय
करुनिया विचार मंथन
घेते ध्यानी आधीच आशय
कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती
तर कधी महत्त्व आरोग्याचे
पण लिखाण ही झालीय प्रवृत्ती
माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
सुंदर कसे ठेवावे पर्यावरण
मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे
देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना
सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शीर्षक --* ५ *माझी अभिलाषा
माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
सुंदर कसे ठेवावे पर्यावरण
कवितेत माझ्या भाव सकारात्मक
असली तमेची कधी निशा
लगेच दाखवी उदाहरण
पहा उज्वल आशेची उषा
माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
सुंदर कसे ठेवावे पर्यावरण
कवितेत माझ्या भाव सकारात्मक
असली तमेची कधी निशा
लगेच दाखवी उदाहरण
पहा उज्वल आशेची उषा
मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे
देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना
सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची
वैशाली वर्तक
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंंबई प्रदेश वनवी मुंबई जिल्हा
आयोजित
उपक्रम क्र ७२८
काव्य लेखन
6 विषय - कविता सुंदरी
आहेसच ग खरच
तू कविता सुंदरी
किती नटविती तुज
अलंकारे खरोखरी
कवी मनी गर्दी जमे
अर्पण्या तुज शब्दालंकार
मन धावे शोधण्या सदैव
नवनवीन कल्पना अविष्कार
कधी लाडिक लडिवाळे
तर कधी प्रबोधक वचने
देऊन साज मौलिक
सजवूनी तूजकरवी कथने
बसतेस कधी कधी का ?
रुसूनी अल्लड होऊनी
साथ न देता यमकाची
गंमत पहाते अडूनी
होता साकार तू सुंदरी
लाभे मना समाधान
सादरी करणास तू तयार
शारदेचे लाभो वरदान
वैशाली वर्तक
माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे
उपक्रम कविता लेखन
7. विषय - *माझे मलाच कळेना*
दिसता समोर दैनंदिनी
आले विचार मनात
केले वंदन शारदेस
झरले शब्द क्षणात
मनीचे शब्द झरता
ओवत गेले शब्दांना
पहाता जाहली कविता
रिक्त करता विचारांना
*माझे मलाच कळेना*
कशी प्रसवली कविता
वाचून पहाता तिजला
भावली जना, मम रचिता
देता विचारांना चालना
नियमित स्फूरते लेखणी
छंदची जडला जिवाला
मम लेखणी , पहा देखणी
झाला लेखनाचा सराव
येती मनात विचार
*माझे मलाच कळेना*
कशी झाले शब्दकार
वैशाली वर्तक
अहमदाबाद
======================
अ भा म सा प समूह 2
आयोजित
उपक्रम काव्य लेखन
विषय - मी कविता
आहे मी मनीचे गुज
दावीते मम रूप
लेखणीच्या साहाय्याने
भावते जनाना खूप
शब्द झरता काव्यातून
समजते कवी मन
कधी हास्य कधी मोद
आनंदीत होती जन
उत्तेजन प्रेरणा देते मनास
वाढे चैतन्य बळ मानसिक
कदापि न होण्या निराश
बदल घडविते सामाजिक
कधी दाविते रम्य निसर्ग
वाहून शब्द रुपे झरा
डौलणारी रान फुले
निसर्गाचा आनंद खरा
रमते कधी भक्ती भावात
ठेवा दृढ विश्वास देवावर
तोची कर्ता करविता
सांगते , तोची आहे विश्वंभर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक
आयोजित उपक्रम क्रमांक ४३
२१\३\२३
जागतिक कविता दिना निमित्त
8 विषय...जेव्हा ती मनात पिंगा घालते
शीर्षक,,, आणि ती येते शब्द रूपात
होते बसले बागेत
झुळूकेच्या तालावर
पुष्पे होती सुंदर डौलत
भान मी हरपले क्षणभर
पुष्पे कानात सांगती
बघ ती पिंगा घालते मनी
रेखाट ना आमचे रुप
तव विचार काव्यातूनी
मज राहवेना त्या क्षणी
माळ शब्दांची गुंफली
भाव मनीचे झरता
कविता पहा साकारली
एक एक सुमनांचे
दाविले रूप मनोहर
ओविता शब्दांचा गजरा
कविता शोभे खरोखर.
घालता ती पिंगा मनात
बसवेना स्वस्थ पळभर
तिला शब्दभावात सजवता
ती संतोषते हेच खर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
अ भारतीय मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हा 2
आयोजित उपक्रम ४७२
२१/३/२३
9 विषय... कविता प्रतिबिंब भावनांचे
गुपित मनीचे
गुज मनीचे सांगते
भाव कळण्या गरज
*प्रतिबिंब भावनांचे*
दावी जनांना सहज.
लेखणीच्या सहाय्याने
समजते कवी मन
कधी हास्य कधी मोद
वाचता होती आनंदी जन
देते उत्तेजना प्रेरणा
चैतन्य बळ मानसिक
न होण्या निराश कदापी
बदल घडवे सामाजिक
कधी दावीते रम्य निसर्ग
वाहून शब्द रुपी झरा
डौलणारी फुले शेते
निसर्गाचा आनंद खरा
सोनसळी किरणांची
होता रोज सकाळ
चित्र रवीचे नभीचे
दावी शब्दभाव शुभ काळ
मन रमता भक्ती भावात
ठेवा दृढ विश्वास देवावर
तोची कर्ता करविता
सांगे तोची आहे विश्वंभर.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
*पहिल्या कवितेचे गुपित*
गुपित एक सांगते
शीर्षक.. अजून सांगु नका हं
जपलीय मनात मी
माझी पहिली कविता
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली गर्विता
केले होते वर्णन तयात
माझ्या बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व आपापले स्वतःचे
लिहीली होती कन्येसाठी
भावली तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय
धाडून द्यावी स्पर्धेला
रचना झालीय हमखास
सुसंबद्ध आहे रचना
सर्वोत्कृष्ट ठरावी, ही मनी आस
साध्या सोप्या शब्दात
केलीय शब्दांची मांडणी
बालभारती पुस्तकांसाठी
आली की हो तिज मागणी
खुश होऊनिया पहातेय वाट
फोन यैईलच खचित
धागा स्वपरिचया सह फोटो
पण मनीचे ठेवा हे गुपित
सा-या मम सख्या तुम्ही
म्हणून कथिले एक गुपित
पण , अजून हे गुपितच ठेवा
हे ही सांगणे तितकेच उचित
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा