कुटुंब
कुटुंब नसते चार जणांचे
सहवासाने लागतो लळा.
स्नेहाचा अन, प्रेमळतेचा
जीवलगांचा , गळ्याशी गळा
वळण शिस्त ती माय पित्याची
बाबा असती आधार खरा
भाऊ भगिनी प्रेमळ नाते
ताई वाटे .प्रेम रुप झरा
खंबीर सदा असती भिंती
स्नेह तर वसे , ठायीं ठायी
साथ देतसे परस्परांना
कुटुंब नांदे सुख सुख दायी
नाती गोती कुटुंब जपते
कुटुंब ताठा तर मनोमनी
हर्ष सदोदित तेची देते.
मान वाढवी लोकात क्षणी
राहती सदा एकजूटीने
विचार स्वार्थी नसे कदापी
सुखीच राहो सर्व कुटुंबी
आळविती जन ही आलापी
वैशाली वर्तक
८\६\२६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा