शनिवार, १६ जानेवारी, २०२१

हे भाव अंतरीचे

काव्य स्पंदन भावगीत
हे भाव अंतरीचे

 हे भाव  मम अंतरीचे ,तुजला उमजतील  का  18
 माझ्या  मनीच्या भावना  तुज हृदयी रुजतील का   18

रोज वाटे तुज पहावे, अवचित भेट ती घडली 
ओढ काय ती जीवास ,नित्याची मज लागली
फुल फुलले कळीतूनी, गुज माझे  उमलेल का    
माझ्या  मनीच्या भावना तुज हृदयी रुजतील का

किती गोड तव हास्य  ते जणू ता-यांचे हसणे
वाटे पहात रहावे सदा तव रुपाचे चांदणे
भासते जसे माझ्या  मनी तुजला ही भासेल  का
माझ्या   मनीच्या भावना तुज हृदयी रूजतील का


लागले   जीवास वेड ,  सतत तुला   पाहणे
होता  जरा नजरे आड , शोधिले  भेटण्या बहाणे
अंतरीचे   बोल  माझे, कोणी तुला सांगेल का
माझ्या  मनीच्या भावना तुज हृदयी रुजतील का



वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मृदगंध

विश्व लेखकांचे साहित्य मंच आयोजित  अष्टाक्षरी काव्यलेखन  विषय    मृदगंध किती  वसुने साहिल्या तप्त  उन्हाच्या झळा   काया तिची भेगाळली  भासे ज...