यारिया साहित्य कला समूह
विषय- एक होती मीरा
मीरेचा गोपाल
वसे तो अंतरी
तया वीण तिचा
दुजा नसे हरी
मुखी सदा नाम
एकच अधरी
गोपाळाची भक्ती
घेतली पदरी
जळी स्थळी मीरा
गोपालच पाही
कृष्णाच्या भक्तीत
सदा लीन राही
विष पण प्याली
राजा तो गिरधारी
अंतरंगी वसे
कोण तिला मारी
नको तिला धन
मोतियांच्या सरी
भजनात रंगे
कृष्ण राहे उरी
सारे जन सांगे
झाली प्रेम वेडी
कृष्ण नामे तिने
बांधियली बेडी
एक होती मीरा
भक्तीत जाणिली
दुजी राधाकृष्ण
नामे ओळखिली
वैशाली वर्तक
सहाक्षरी आठवण
सुख न् दुःखांची
असे साठवण
कधी येते त्याची
मनी आठवण 1
डोळा उभे राही
रम्य बालपण
मोद देइ जीवा
त्याची आठवण 2
आठवात आहे
भेट ती पहिली
कसे विसरीन
अपूर्व ठरिली 3
मनी दरवळे
गंध सुमनांचा
स्पर्श तुझा देई
मनी आनंदाचा 4
यशाचे दिवस
राही स्मरणात
अपयशी क्षण
नको आठवात 5
पहिल्या प्रेमाच्या
किती आठवणी
अजुनी करिते
मनी साठवणी 6
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा