काव्यस्पंदन 02 राज्य स्तरीय
भावगीत लेखन
विषय -- स्नेह तीळाचा अखंड राहो
शीर्षक - प्रेमभाव
राहो स्नेह अखंड तीळाचा
वाहो झरा नित्यची प्रेमाचा धृपद
जशी वसे तीळात स्निग्धता
तशी हृदयी राहो ममता
भाव परस्परांशी स्नेहाचा
वाहो झरा नित्यची प्रेमाचा 1
गुळाचा गोडवा वसो मुखी
मन राहे सदाकाळ सुखी
राहो संबंध तो जिव्हाळ्याचा
वाहो झरा नित्यची प्रेमाचा 2
गुळ तीळाची भेट घडता
गोडी स्निग्धतेशी जोडी जमता
मैत्री भाव गुण्या गोविंदाचा
वाहो झरा नित्यची प्रेमाचा 3
वैशाली वर्तक 15/1/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा