सोमवार, १८ जानेवारी, २०२१

जग उजळले सारे

जग उजळले सारे

नव आशांचा उदय
उजळले जग सारे
सदा प्रसन्नता  वाटे
वाहे चैतन्याचे वारे

येता रवी राज नभी
उधळले नव रंग
भरु जीवनी उल्हास
नित्य कामी होऊ दंग

पहा पक्षीगण उडे
घेत  गगनी भरारी
भरुनिया बळ पंखे
देउ मनास उभारी

दिन रोजचाच नवा
करा उत्कषे साजरा
पहा सांजवेळी मग
  दिसे  चेहरा हासरा


राहो सारेची सुखात 
होता  जीवनी उन्नती 
उजळले जग सारे
पहा जगाची प्रगती

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्योत लावू मना मनात

स्पर्धा स्पर्धा  स्वप्नगंध साहित्य समूह  दिवाळी निमित्त ओळ काव्यलेखन स्पर्धा  ओळ. ज्योत लावू मना मनात   विषय..ज्योत लावू मनामनात  शीर्षक. *आ...