शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०

संस्कार महत्व संस्काराचे

अ भा.म. सा. परिषद.समूह 2
उपक्रम -- काव्य प्रकार 
विषय -- संस्कार 

**महत्त्व  संस्काराचे**


संस्कार 


असे मातीचाच गोळा
जीव जणू  उदरात
माता करीते चिंतन
सुविचार ते मनात

गर्भातून देई तया
सदा सात्त्विक  विचार
 जन्म  देऊनी बाळास
बने माता शिल्पकार 

 संस्काराच्या बळावर
  होई यशस्वी उज्वल         
  मिळे  किर्ती आयुष्यात    
  मत   खरेची प्रांजल

  देई कुंभार मातीला
 प्रेमभावे  तो आकार
होतअसे मनाजोगा
घट करी तो साकार
 
 करी शाळेत शिक्षक 
 संस्काराची उजळणी
जीवनात उपयोगी 
राहे सदा आठवणी

असे असते जीवनी
संस्काराचे ते महत्त्व 
होतो सदाची यशस्वी
मिळवितो तो श्रेष्ठत्व

वैशाली वर्तक..5/11/20




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...