सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०

अभंग साहित्याची गोडी....साहित्य

सावली प्रकाशन समुह
काव्य प्रकार -- अभंग
विषय -- साहित्याची  गोडी

स्पर्धेसाठी

वाचन आवड   । 
करीते मनन     । 
देतसे स्फुरण   । 
विचारास ।।           1

असता मनात   । 
वाचनाची गोडी   । 
लिखाणास जोडी  । 
मिळतसे ।।              2

ओढ साहित्याची । 
मनी संकल्पना । 
मिळते  कल्पना । 
लिखाणास ।।        3

किती पहा त-हा  । 
मोठाच पसारा । 
गद्य पद्य धारा । 
साहित्याच्या ।।      4

मराठी साहित्य । 
आहेच सखोल  । 
जाणा त्याचे मोल । 
वाचुनिया ।।          5

संताचे वाङमय । 
देते मना शांती । 
नुरतेच भ्रांती । 
जीवनाची ।।        6

विनोदी रहस्य । 
मार्मिक सात्विक । 
प्रतिभा प्रतिक । 
प्रकार ते ।।             7

म्हणूनच ऐका । 
साहित्याची  गोडी। 
मना मना जोडी । 
सांगे वैशू  ।।    8

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...