सिध्द साहित्यिका समूह
अष्टाक्षरी
विषय - विश्वास
ठेवा मनात विश्वास
होण्यासाठी स्वप्नपूर्ती
नका ढळू द्यावा तया
मिळे मग यश किर्ती
चाला दृढ विश्वासाने
नको मनी किंतु कदा
यश मिळणार नक्की
दूर संशय सर्वदा
दूर होईल संकट
जरी काळ खडतर
वाट असेल बिकट
जिंकू आत्म बळावर
असे भरती ओहोटी
समुद्रास पहा सदा
रममाण विश्वासात
कधी न होता कष्टी कदा
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा