प्रेमाची अक्षरे साहित्य समूह आयोजित
उपक्रम
शब्दा वाचुनी
साहित्य नसे
मनोरंजन
होणार कसे 1
शब्द गुंफता
होते कविता
सदा वहावी
शब्द सरिता 2
जपा शब्दांना
नको ते व्यर्थ
उचित हवे
तयांचे अर्थ 3
झरता शब्द
मिळते ज्ञान
दूर सारिते
सदा अज्ञान 4
स्तुती करण्या
शब्दची कामी
काम साधण्या
युक्ती ती नामी 5
न लागे पैका
गोड शब्दाला
नका कंजुस
त्या वचनाला 6
कटु शब्दांनी
मन दुःखते
गोड वाणीने
ते सुखावते 7
उमजे भाव
शब्दांनी असे
नसता शब्द
संवाद कसे 8
वैशाली वर्तक
प्रेमाची अक्षरे साहित्य समूह
पाचाक्षरी काव्य
विषय -- आधार
तुझ्याच देवा
आम्हा आधार
तुची सावरी
जगाचा भार
माय बापांना
काळजी फार
पाल्याचा कधी
न वाटे भार
वेलींची धाव
वृक्षांच्या कडे
आधारा वीण
तयाचे नडे
पहा निसर्ग
कसा हिरवा
वर्षाच्याधारे
दिसे बरवा
फिरता धरा
सूर्याभोवती
याच आधारे
ऋतु घडती
येता संकट
एकच ध्यास
आधार हवा
वाटेची खास
वैशाली वर्तक
प्रेमाची अक्षरे
पाचाक्षरी
विषय -- ध्यास
एकलव्यला
एकची ध्यास
धनुर्विद्धेत
होईन खास
सोड हा ध्यास
न उरे भास
उगा विचार
नको मनास
एकच मनी
असते आस
कसे होणार
जीवास ध्यास
कुठले काम
होते ते पूर्ण
असता ध्यास
करी संपूर्ण
यश मिळावे
हीच आस
सदा प्रयत्न
हाच ध्यास
स्वच्छ भारत
हेच स्वप्नात
याचाच ध्यास
हवा मनात
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा