सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
लाटा येती फेसाळूनी अधीर त्या भेटण्यास 16
लाजूनी विरूनी चूर होती येता किना-यास 16
हर्षे उल्हासे सप्तरंगी जगतोस रंगूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
अगणित मौल्यवान मोती दडले तव उरात 16
शोधिता नसे अंत ना पार थकती गर्भात 16
ओळखती रत्नाकर नामे तुजला म्हणूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
भरती ओहोटी असे जरी जीवनात सदा 16
कसे जमते न दावणे ओहोटी चे दुःख कदा 17
गुढ अशी जीवन कहाणी गाजेत ऐकूनी 16
सागरा मन बघ माझे आले उचंबळूनी 16
वैशाली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा