गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०

अष्टाक्षरी पाहू चला फूलबाग /माहेराच्या अंगणात


अष्टाक्षरी

काव्य स्पंदन राज्य स्तरीय 02
 विषय-       *पाहू चला फूलबाग*

शीर्षक  -- माझी  बाग

माझ्या  बागेत फुलली   
फुले पहा हो अनेक
किती सुंदर  मोहक
नावे ऐका एक एक

दारी फुलली बोगन
देते विसावा जनास
पुढे येता बहरला
 झेंडू  पहा स्वागतास

मन मोहक मोगरा
हसे लपूनी पानात
सुगंधित आसमंत
होत असे क्षणार्धात       

बहु रंगात फूलला
आहे गुलाब सुरेख 
सदा राखिला पूजेला
मनी आखुनिया रेख

जुई कशी लवुनिया
खिडकीत हळुवार
मंद गंध पसरवी
दावी रुप अलवार

पारिजात शेजा-यांचा
गंधाळूनी बहरला
सडा  अंगणात माझ्या 
आहे पहा पसरला 

उभी आहे सदा साठी
डौलदार  रातराणी
होता सांज उमलूनी
रात्री  म्हणे  नीज राणी

वैशाली वर्तक




सिध्द साहित्यिका समूहा उपक्रम
  *माहेरच्या अंगणात*


असे छोटेसे अंगण
दिसे कसे ऐटदार
घराची शोभा वाढे
 दिसे सदा बहारदार

दारी  उभी बोगन
स्वागताला अंगणात
येता जाता देई छाया
खुश होती जन मनात

पुढे झेंडू बहरला
सदा झुकवून मान
फुले येती बारमास 
पाकळ्यांची पहा शान

औषधाला सदा राखली
दाट जाड पाने ओव्याची
पालक हिरवा डुलतो
पालेभाजी मिळे अंगणाची

माहेराच्या अंगणात
डौलात उभी रातराणी
जुई  खिडकीशी  लवून
सुंगध पसरवत गाई गाणी

मधोमध झुलतो झुला
आठवांचा तो पसारा
मस्त  बसून जाते रंगून 
देतो सदा सुखद शहारा

वैशाली वर्तक










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...