दिनांक 6/8/2021
विषय - चित्र काव्य लेखन
अष्टाक्षरी रचना
सर्व लेकरे देवाची
तरी किती विसंगती
दोन सुखात नांदती
दोघे भंगार वेचती 1
मनी इच्छा शिक्षणाची
बाल मनी असे आस
कधी आम्ही पण जाऊ
पूरी व्हावा माझा ध्यास 2
आपणच का वंचित
नाही नशीबी शिक्षण
गणवेश घालू शिकू
कधी येईल तो क्षण. 3
नको भंगार वेचणे
जाऊ शारदा मंदीरी
घेऊ दप्तरे पाठीशी
हीच ईच्छाअंतरी 4
कसे ऐटीत जातात
पाठी नवीन दप्तर
आम्ही उचलतो झोळी
अंगी जुनीच लक्तर 5
हेच ते असे नशीब
कोणा मुखी गोड घास
सम वयस्क असता
मिळे न हवे ते खास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा