श्रावण हिरवा
बरसल्या जल धारा
वसुंधरा बहरली
रानफुले उमलली
तृणांकुरे अंकुरली 1
साज नवाच धरेला
रंग दिसेची हिरवा
पाचू भासे पसरला
ऋतू म्हणती बरवा 2
पहा रुपवती धरा
शोभे हरित कंकण
लाल पीत सुमनांचे
केले खड्यांनी गुंफण
कधी पडे रिमझिम
पहा झिम्माड पाऊस
नद्या वाहे खळखळ
भिजण्याची संपे हौस 3
कड्यातून वाही झरे
भासे शुभ्र दुग्ध धारा
हास्य लोभस निसर्ग
गीत गाई मंद वारा 4
येता श्रावण बरसे
रिमझिम जलधारा
सरी वर सरी येती
थंड गार झोंबे वारा 5
रुप पहा वसुधेचे
कसे दिसे मनोहर
जणू हिरवे गालिचे
भासे सर्वत्र सुंदर 6
*ऋतु हिरवा*
धारा बरसल्या
धरा अंकुरली
येताची श्रावण
मन आनंदली
सरी वर सरी
बरसती धारा
आला तो श्रावण
थंड झोंबे वारा
क्षणी बरसून
खेळआदित्याचा
दिन तो उन्हाचा
पुन्हा पावसाचा
कड्यातून झरे
भासे दुग्ध धारा
लोभस निसर्ग
गाणे गातो वारा
महिना असतो
सणांचा श्रावण
आप्तजन भेटी
मनाला भावन
मनात भरतो
ऋतु तो हिरवा
सृजन धरेचा
सदैव बरवा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा