निसर्ग गातो गाणी
निसर्ग तर आहेच गुरु
तोच शिकवितो सर्व काही
पंचतत्वाने तयार निसर्ग
असती तेची गाती बोलती
पंचतत्वांनी बनले निसर्ग
तेच सांगे बोले गाई गाणी
हर हलचालीत असे लय
मंजुळ झुळुझुळु वाहे पाणी
गर्जत बरसती जलधारा
गातो पाउस मल्हार रागात
दामीनी दावी चमकून नृत्य
शीळ घालीत फिरे वारा वनात
होता उषःकाल येते कानी
मधुर सुरात पक्षाची वाणी
मंद सुमनांचा गंध दरवळे
हसूनी डौलती गाती गाणी
भरलाय सारा निसर्ग असा
सुंदर चित्रकार आहेच बरा
गाणी गातो शिकवितो आपणा
निसर्गाच आहे शिक्षक खरा
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा