शब्दरजनी साहित्य समूह
आयोजित
उपक्रमासाठी
ललित लेखन
विषय - स्वर्ग नक्की कुठे?
स्वर्ग नक्की कुठे?
"अरे बाबा जीवनात सत्कर्म कर तर स्वर्गात जाशील असे लहान पणी शब्द मोठ्यांच्या तोंडून ऐकलेले आठवतात.
अथवा कष्ट करा तर फळ मिळते साठी वारंवार उच्चारले जाते की ,चला उठा आपणच "मेल्या शिवाय स्वर्ग दिसणार नाही" .
लहानपणी स्वर्ग म्हटले की वर आकाशाकडे बोट व नर्क म्हणता पाताळाकडे बोट जाई. आता कळतय .स्वर्ग मनात वसलाआहे...कर्मात आहे..स्वर्ग मानण्यात आहे... स्वर्ग निसर्गात आहे.
एखादे काम मनाजोगे होता ...कामास भरघोस यश मिळता आनंद प्राप्त होतो.कधी स्वतः च्या वा कधी मुलांच्या मिळलेल्या यशाने मन आनंदाने भरते .स्वर्गीय आनंद मिळतो. यशाने मनास आनंद लाभता आनंदाने स्वर्ग सुख लाभते. कुटुंबातील सर्व जन सुखात, समाधानात नांदत आहेत .एकमेकात प्रेमभाव व प्रेमभावात समृद्धी
आहे .तर अपसुकच शब्द मुखी येतात. मी "सुख स्वर्गात" आहे. म्हणजेच आनंदात स्वर्ग असतो तर.
एखाद्या रम्य निसर्ग स्थळी फिरावयास जाता अथवा नयनरम्य देखावा.. जसे झुळुझुळु वहाणारे पाणी.... लहानमोठे हिरवळीचे डोंगर... .विविध रंगी हवेच्या झुळके सरशी डोलणारी फूले .. .मनास भावतात व सहज शब्द येतात अहाहा ! जणू स्वर्गच. म्हणजेच काय आनंददायी ,अल्हाददायी दृश्य दिसता ....वा प्रसंग घडता स्वर्गात असल्याचा भास होतो . अनुभवतो.
आता पहाना! ..मुलाने सुंदर बंगला घेतला .आईबाबांच्या समृद्धीत , स्वकर्तृत्वाने सन्मार्गे वाढ करित आहे .त्या आईवडीलांना स्वर्ग सुखच लाभते. रोजचा दिवस स्वर्ग सुखात अनुभवतात. म्हणजेच समाधानात आनंद ...आनंदात सुख ...सुखात स्वर्ग असतो.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा