*स्पर्धेसाठी*
प्रेमाची अक्षरे परिवार
प्रेमाची अक्षरे द्वितीय महास्पर्धा २०२१*
फेरी क्रमांक ०४
अष्टाक्षरी काव्यलेखन स्पर्धा
*
दिनांक - *६/८/२०२१*
विषय - खेळ शब्दांचा मांडला
शीर्षक -
साहित्यात एकंदर
। खेळ असे तो शब्दांचा
पूर येतो कल्पनेला
पसाराचा विचारांचा 1
शब्द भंडार हवाच
रचताना काव्य ओळी
छंद वृत्त यमक ही
हवे मनी सदा काळी 2
गद्य पद्य वाङमयाचे
असे किती ते प्रकार
कोटी करीता शब्दांची
होई साहित्य साकार 3
जुळवूनी शब्द शब्द
होते तयार लिखाण
असो मग गद्य पद्य
शब्दांचीच असे खाण 4
मुल्य सर्वदा शब्दांचे
जाणे शब्द शिल्पकार
शब्द ओवितो उचित
करी तो शब्दाविष्कार 5
भाषा नटविण्या हवे
शब्दांवर ते प्रभुत्व
खेळ शब्दाचा मांडता
जाणा शब्दाचे महत्त्व 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
8141427430
स्वलिखीत रचना
सावली प्रकाशन समूह
काव्य लेखन
उपक्रमासाठी
16/12/21
विषय - ओळ कविता
ओळ - शब्द सरी बरसल्या
*काव्य रचना*
मनी दाटलेले भाव
हाती घेता लेखणीला
*शब्द सरी बरसल्या*
धारा भेटल्या मातीला
असे गुज अंतरीचे
उमटवे ती लेखणी
शब्द सरी बरसता
भासे मजला देखणी
अशा नवरस पूर्ण
*शब्द सरी बरसल्या*
जणु मेघवर्षा आल्या
मन भावन ठरल्या
शब्द सहज झरता
दावी हृदयाचे भाव
शब्द शब्द जोडुनिया
घेई अंतरीचा ठाव
शब्द असती सुमने
नाना रंगी उधळण
भक्ती, शौर्य ,धैर्य ,शांत
जणु शब्द पखरण
पहा शब्द एक-एक
झरला लेखणीतूनी
झाली कविता तयार
मोद झाला मनातूनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
माझी शब्द सखी
कल्याण डोंबिवली महानगर
विषय - शब्द सखा माझा
दिन उजाडता
येते तिची सय
शब्द सखी माझी
करी हयगय
धावूनी मनात
करीतात गर्दी
घाई लेखणीला
लावण्यास वर्दी
लागताच वर्दी
रूप साहित्याचे
संवाद वा काव्य
दावी वाङमयाचे
देती साथ मला
राखे विचारात
कसा जातो दिन
कळे न क्षणात
मिळे विचारांना
सहजच वाट
उमटे भावना
साहित्याचा थाट
वैशाली वर्तक
अहमदाबाद
शब्द
पंचाक्षरी
शब्दा वाचुनी
साहित्य नसे
मनोरंजन
होणार कसे 1
शब्द गुंफता
होते कविता
सदा वहावी
शब्द सरिता 2
जपा शब्दांना
नको ते व्यर्थ
उचित हवे
तयांचे अर्थ 3
झरता शब्द
मिळते ज्ञान
दूर सारिते
सदा अज्ञान 4
स्तुती करण्या
शब्दची कामी
काम साधण्या
युक्ती ती नामी 5
न लागे पैका
गोड शब्दाला
नका कंजुस
त्या वचनाला 6
कटु शब्दांनी
मन दुःखते
गोड वाणीने
ते सुखावते 7
उमजे भाव
शब्दांनी असे
नसता शब्द
संवाद कसे 8
वैशाली वर्तक
आजचा शब्द
साहित्यात एकंदर
खेळ असे तो शब्दांचा
पूर येतो कल्पनेला
पसारा तो विचारांचा
शब्द भंडार हवाच
रचताना काव्यओळी
छंद वृत्त यमक ही
हवे मनी सदाकाळी
गद्य पद्य वांडमयाचे
असं किती ते प्रकार
कोटी करिता शब्दांची
होई साहित्य साकार
जुळवूनी शब्द शब्द
होते तयार लिखाण
असो मग ते गद्य पद्य
शब्दांचीच असे खाण
मुल्य सर्वदा शब्दांचे
जाणे शब्द शिल्पकार
शब्द ओविता उचित
करी तो शब्दाविष्कार
भाषा नटविण्या हवेछ
शब्दांवर ते प्रभुत्व
खेळ शब्दांचा मांडता
कळे शब्दांचे महत्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा