भेट आठव आपुली, चंद्र साक्षीत घडलेली 16
हाती घेवूनीया हात वचने ती दिधलेली 16
गंध येई सुमनांचा थंड हवेचा गारवा 16
धुंद रात्री मिळुनिया, गोड गायिला मारवा 16
किती मधुर सुरात चांदरात रंगलेली 16
भेट स्मरे अपुली, चंद्र साक्षीत घडलेली 16
फुले हसली गंधित पाहूनी अबोल प्रीत 16
वदली ती हळुवार , हीच असे प्रेम रीत 16
ऐकून शब्द कानी, अलवार उमलली 16
भेट स्मरे अपुली, चंद्र साक्षीत घडलेली 16
अवचित आलो आज चंद्र पहा तो हसला 16
आठवून ती रात्र, वृक्ष फुलांनी बहरला 16
तया आपुली प्रीती ही , मनातून स्मरलेली 16
भेट स्मरे अपुली, चंद्र साक्षीत घडलेली 16
.....वैशाली वर्तक10/11/20
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा