रोही पंचाक्षरी समूह आयोजित
रोही पंचाक्षरी काव्य स्पर्धा
विषय - पुस्तक
करा वाचन
सदा पठण
ते अज्ञानाचे
करे हरण 1
ज्ञानाची खाण
अगाध छान
पुस्तकातील
घ्यावे हो ज्ञान 2
वाचावे ग्रंथ
सांगती संत
मिळवा ज्ञान
मिळे सुपंथ 3
मनीची आस
हवा हो ध्यास
वाचनालय
त्यासाठी खास 4
नसे लहान
असे महान
पुस्तकं देते
जगी सन्मान 5
असे सोबती
करी गंमती
वाचनासाठी
नको संमती 6
मनोरंजन
बुध्दी व्यंजन
ज्ञान वर्धन
मानती जन 7
येताची घरी
पुस्तक करी
आनंद वाटे
तो क्षणभरी 8
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा