मंगळवार, २ मार्च, २०२१

आंगण

असे छोटेसे अंगण
पहा कसे ऐटदार
 शोभा वाढवी घराची
 दिसे सदा शानदार

दारी  उभी बोगन
स्वागताला अंगणात
येता जाता देई छाया
खुश होतात  मनात

पुढे झेंडू बहरला
सदा झुकवून मान
फुले येती बारमास 
पाकळ्यांची पहा शान

औषधाला सदा राखली
दाट जाड पाने ओव्याची
पालक हिरवा डुलतो
पालेभाजी मिळे अंगणाची

जुई  लवुन खिडकीत 
सुंगध पसरवे गात गाणी
माहेराच्या अंगणात
डौलात उभी रातराणी

मधोमध झुलतो झुला
आठवांचा तो पसारा
मस्त  बसून जाते रंगून 
देतो सदा सुखद शहारा

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...