रोही पंचाक्षरी
विषया -- ऋतु वसंत
वसंत
येता बहर
फिरे नजर
पानो पानात
भासे कहर 1
नवी पालवी
सृष्टी खुलवी
ऋतु वसंत
मना मोहवी 2
सदा असावा
मनी ठसावा
वसंत ऋतु
तो आठवावा 3
कोकील गान
हरपे भान
वसंतातील
ऐकावे छान 4
मंद पवन
वनी गुंजन
सहा ऋतुचे
ऐकू कथन 5
नूतन वर्ष
मनात हर्ष
येता वसंत
हा परामर्श 6
तो ऋतुराज
वेगळा साज
ऋतू वसंत
दिसतो आज 7
धन्यवाद गुरुजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा