रंग मोहक तुझे रे
वेड लावतसे जीवास
पसरलेल्या पंखांनी आता
घे स्वानंदे भरारी उडण्यास
शोध तव साथीदारांना
विहरताती मस्त नभात
आठव तुझे जोडीदार
फिरण्या हिरव्या राना वनात
उषःकालच्या किलबिलीत
ओळखतील तुझा रव
मनास होईल समाधान
असता सकाळ ती निरव
भेट तुझ्या सवंगडींना
घेता झोके फांदीवर
लुट स्वच्छंदे जगण्याची
दाणे टिपण्यात भरभर
पाहून तुझी भरारी
दिला मनास आनंद
क्षणभर लागला मनी
तुला पहाण्याचा छंद
वैशाली वर्तक
रंग मोहक तुझे रे
वेड लावतसे जीवास
पसरलेल्या पंखांनी आता
घे स्वानंदे भरारी उडण्यास
शोध तव साथीदारांना
विहरताती मस्त नभात
आठव तुझे जोडीदार
फिरण्या हिरव्या राना वनात
उषःकालच्या किलबिलीत
ओळखतील तुझा रव
मनास होईल समाधान
असता सकाळ ती निरव
भेट तुझ्या सवंगडींना
घेता झोके फांदीवर
लुट स्वच्छंदे जगण्याची
दाणे टिपण्यात भरभर
पाहून तुझी भरारी
दिला मनास आनंद
क्षणभर लागला मनी
तुला पहाण्याचा छंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा