काव्य स्पंदन 02 राज्य स्तरिय
उपक्रम
काव्य प्रकार - अभंग
रामा रघुराया
तुझाच आधार
जगताचा भार
सावराया 1
कोण दाखवेल
मार्ग मानवाला
सा-या जगताला
तारण्यास 2
सुचते न काही
प्रसंग हा बाका
देतो आम्ही हाका
मार्ग दाता 3
काय कैसे करु
ये ना उध्दाराया
तूच रामराया
जगताला 4
करीती प्रयास
जरी सारे जन
निराशले मन
मार्ग दाता 5
तूच मार्ग दाता
कर रोग मुक्त
आले तुझे भक्त
चरणाशी
रामराया तूला
आले मी शरण
करिते नमन
मार्ग दाता
वैशाली वर्तक
काव्य स्पंदन 02 राज्य स्तरिय
घड्याळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा