शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०

मातृभुमी.. तिरंगा/जल्लोष भारत मातेचा /चिरायू होवो प्रजासत्ताक दिन आज तिरंग्यात पावन झालो

अष्टपैलू संस्कृती  कला अकादमी मुंबई आयोजित
राज्य स्तरीय काव्य लेखन स्पर्धा  क्रमांक 5
विषय -- मातृभुमी

काव्य प्रकार अष्टाक्षरी

         मातृभुमी

माझी  मातृभुमी मज
जिचा मला अभिमान
प्राणाहून असे  प्रिय
तिच्या  गौरवात शान

भाव वसे समतेचा
नांदी धर्म ते अनेक
नसे भेद- भाव जना
अशी भुमी , जगी एक


पहा किती एकात्मता 
होती संस्थाने अनेक
मान ठेवून शब्दांचा  
अखंडित  झाली  एक


भुमी स्वातंत्र्य वीरांची
आहे शूर वीरांची गाथा
लाल- बाल- पाल स्मृती 
स्मरताच , टेके माथा

देश हा आत्म निर्भर
येता प्रसंग तो बाका
स्वावलंबी होती जन
येता मदतीच्या हाका

नव्या युगाचे बदल             
प्रगतीची ती चाहुल
राही सतर्क शास्त्रज्ञ 
जगी पुढेची पाऊल

        
  वैशाली वर्तक  15/10/2020



सावली प्रकाशन समूह 
विषय -- तिरंगा


...तिरंगा

पहा   फडकतो तिरंगा नील गगनी 
 वाटे अभिमान तो मजला क्षणो क्षणी 
        
  तीन रंगात पहा ,भाव दावितो शुध्द
  हिरवा दावी देश ,आहे सदा समृध्द
  भगव्यात त्यागाची, भावना सांगे मनी
 वाटे अभिमान तो, मजला  क्षणोक्षणी      1

पाहून तिरंग्यास ,उर  येतो भरुनी
क्रांती वीर लढले, तया कवटाळूनी
हुत्म्यास पांघरता  , दुःख दाटते मनी
वाटेअभिमान तो, मजला  क्षणोक्षणी           2

शान तिरंग्याची ती , मोद देई मनाला
श्वेत रंग संदेश  , शांतीचा जगाला
कार्यरत रहाण्या, सांगे  तो चक्रातूनी
वाटे अभिमान तो , मजला क्षणो क्षणी           3

सदा राखूया मान, आपुल्या तिरंग्याचा 
नाही होऊ देणार अवमान कधी त्याचा
राहिल फडकत ,अखंडित गगनी
वाटे अभिमान तो, मजला क्षणोक्षणी             4

वैशाली वर्तक














शब्दरजनी साहित्य  समूह 
विषय -- जल्लोष भारत मातेचा

जल्लोष भारत मातेचा

आज दिन प्रजासत्ताक 
करिती साजरा जन सारे
हर्ष अन्  उल्हासात
लावूनिया देशभक्तीचे नारे
 
जल्लोष भारत मातेचा
  देश प्रेम नागरिकांच्या मनात
समतेचा समानतेचा भाव 
दाविती गौरवाने जगतात

मनी ठेवती आदर भाव 
स्वातंत्र्यासाठी अर्पून प्राण
घरा दाराची करुनी होळी
देशासाठी  शहिदांनी केले बलिदान

तिरंगा  देशाचे मान चिन्ह
तयाची  आहे आगळी शान
फडकत राहो तो अविरत
मनी नागरिकांच्या असे मान


 करु जल्लोष  भारत मातेचा
 संपन्न समृद्ध करण्या देशाला
  बनेल आत्म निर्भर नागरिक
  लहरत ठेवण्या तिरंग्याला

वैशाली वर्तक


विषय .. ..*चिरायू   प्रजासत्ताक दिन*


ठेवू मान स्वातंत्र्य दिनाचा
नाही प्राप्त झाले  ते सहज
स्वातंत्र्य वीरांनी अर्पियले
प्राण त्यांनाच स्मरणे गरज.


नव्हते स्वातंत्र्य आपणास
केल्या चळवळी अविरत
किती सोसावा त्यांचा अन्याय
आधी करावा स्वतंत्र भारत

 केले देशासाठी दुर्लक्षित       
 स्वतःची कुटुंब  व संसार. 
 देश केला पारतंत्र मुक्त
 स्वातंत्र्य प्राप्ती हाच विचार 


 प्रजासत्ताक दिन साजरा
 करिती स्वतंत्र भारताचा
 प्रजेच्या सत्तेने चाले देश
 आनंदी दिन सा-या देशाचा


 बलसागर होवो भारत
 असती  आपुल्या अभिलाषा
 चिरायू  प्रजासत्ताक दिन
जगी  उन्नत भारत आशा





माझी लेखणी साहित्य  मंच शहापूर , जि  ठाणे
आयोजित 
स्वातंत्र्य  दिननिमित्ताने विशेष , भव्य दिव्य  महास्पर्धा
विषय -  आज तिरंग्यात  पावन झालो मी. 
   
       "देशासाठी प्राण अर्पण"

होते ध्येय  स्वातंत्र्य प्राप्तीचे
भारतमातेला स्वतंत्र  करण्याचे
आपल्याचा देशात आपण गुलाम 
कधीच मनास न रुचण्याचे

केले प्रयत्न  देशभक्तांनी
तिरंग्याचा सदा राखिण्या मान
धरूनी स्वातंत्र्याची कास मनी
"वंदे मातरम्" चा सदा अभिमान

हसत साहिला तुरूंगवास
करुनी घराची राख रांगोळी 
आस स्वतंत्र भारत पहाण्याची 
हटले नाही मागे झेलता गोळी


 होते  असे वीर देशप्रेमी
वदले मरणांन्ती प्रसन्न  मनाने
"आज तिरंग्यात पावन झालो मी"
 अर्पीला प्राण देशाभिमानाने.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद



वर्ल्ड व्हिजन संस्था मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा 
दि 24/1/24
काव्यलेखन
विषय... प्रजासत्ताक दिन देशाचा अभिमान 
 शीर्षक...चिरायू   प्रजासत्ताक दिन

ठेवू मान स्वातंत्र्य दिनाचा
नाही प्राप्त झाले  ते सहज
  अर्पीले प्राण शूर वीरांनी
 स्मरण करणे त्यांचे गरज
 
नव्हते स्वातंत्र्य आपणास
केल्या चळवळी अविरत
किती सोसावा त्यांचा अन्याय
आधी करावा  स्वतंत्र भारत

 केले देशासाठी दुर्लक्षित       
 स्वतःचे कुटुंब  व संसार. 
 देश केला पारतंत्र मुक्त
 स्वातंत्र्य प्राप्ती मनी विचार 

बाबासाहेब आंबेडकर
 संविधानाचे खरे शिल्पकार
तोच दिवस प्रजासत्ताक 
म्हणून त्यांचा जयजयकार 

 प्रजासत्ताक दिन साजरा
 करिती स्वतंत्र भारताचा
 प्रजेच्या सत्तेने चाले देश
 आनंदी दिन सा-या देशाचा

 बलसागर  भारत होवो 
विश्वात शोभावा अभिलाषा 
 चिरायू  प्रजासत्ताक दिन
  उन्नत भारत  ही मनीषा

वैशाली वर्तक
अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...