मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०

गीत.....आले लावण्य भरास

विषय - आले लावण्य भरास 


वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप
येता जाता चाळा लागे बघण्याचे ते स्वरुप


विचारते दर्पणाला सांग कशी मी दिसते
उगा पदर ढळता  मान वेळावून बघते
 माझे न मी  रहाते ,मोदभरे मनी खूप 
           वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप      1

चोळी झाली घट्ट सर आले लावण्य भरास 
गाली फुलले गुलाब छंद जडे नटण्यास
घेई चाहुल मन ते उगा वाटे हुरुप
              वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप      2

ओढ लागे सांजवेळी  कुणीतरी यावे वाटे
पारिजात गंधाळता  फूलासंगे हर्ष दाटे
 यावा अवचित पाहुणा  मजसी अनुरुप
                वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप      3


बट लाडिक भाळीची उगा बोटाने  सावरे
वारा खट्याळ तिजला पुन्हा पुन्हा  न आवरे
मनी भावला खेळ हा  झाले तया एकरुप
                    वाटे पहावे दर्पण निरखून घ्यावे रुप   4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...