अभंग लेखन स्पर्धा
विषय -- अहंकार
स्पर्धे साठी
अभंग रचना
विषय - अहंकार
नको आणू कदा. ।
मनी अहंकार ।
वाईट विकार ।
असे तोची ।। 1
राहो मनी भाव ।
इदम न मम ।
नकोची अहम ।
कदा काळ ।। 2
नसावे मनात ।
स्वतःचे मी पण ।
हेच निरुपण ।
जीवनाचे ।। 3
स्वभावात रीपू ।
असती ते सहा ।
सारुनिया पहा ।
अहंकार ।। 4
असता संतोष ।
मी पण ते दूर!।
भरुनिया ऊर
येत असे ।। 5
रहा समाधानी ।
अहम नको मनी ।
मोद सदा क्षणी ।।
मिळतसे ।। 6
सशाचा तो गर्व ।
सदा ठेवा ध्यानी ।
राहू द्यावा मनी ।
जगताना ।। 7
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा