जाता जाता रवीराजाने घातले केशराचे सडे
आसमंत खुलला सुंदर वाटे पाहू कुणीकडे
सांजवेळी भेटता सखया उर भरे आनंदाने
ओढ जिवाला लागलेली तृप्त जाहली भेटण्याने
सांजवेळ असतेच अशी ओढ लावते जीवाला
भेटताच जीवलग, मिळे सदा आनंद मनाला
घेउनी हात हाती आळवीती दोघे प्रेम गीतांना
राहू सदा जवळी असे साथ देत एकमेकांना
रवी राजा स्वतः पाही प्रतिबिंब ते जलाशयात
पाहूनीया ते हरखले दोघे क्षणभरी मनात
वैशाली वर्तक
सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित आठोळी लेखन
विषय. सांजवात
दाही दिशा हळदीच्या
संधी प्रकाशे धुंदल्या
मंद थंड पवनाने
तप्त झळा निवळल्या.
अर्ध्यदान देती जन
दोन्ही करांना जोडूनी
*सांजवात* वृंदावनी
मंद प्रकाश उजळूनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा