उपक्रम
बालगीत काव्य
विषय- आई म्हणते
आई म्हणते ( बाल काव्य)
वर्ण 14 यति 7
आई म्हणते तूची, भासे नभीचा तारा
तुज वीण भासतो, मज बाकी पसारा
म्हणे मजला सदा ,माझा गोड गोडुला
सदा मज साठी तो, असे माझा सानुला
भरलास तूची या , जीवनी मोद सारा
आई म्हणते तूची , भासे नभीचा तारा 1
घेउनी जाते सदा , मैदानात खेळाया
देते मस्त मस्त ची, खाऊ सदा खावया
सोनुला माझा आहे , मला सदाची प्यारा
आई म्हणते तूची ,भासे नभीचा तारा 2
सहज पुरविते, ती लाड सोनुल्याचे
सदाची तिला वेड ,माझे पापे घेण्याचे
मज होता तो बाऊ , घालतेसे ती वारा
आई म्हणते तूची, भासे नभीचा तारा 3
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा