सोमवार, २१ सप्टेंबर, २०२०

भाऊराया ( गीत रचना )

भावगीत 
विषय- भाऊराया
स्पर्धे साठी
अक्षर संख्या 16  .यति 8

सय येता माहेराची, आठवतो बंधुराया
सदा दावी प्रेमभाव, बहिणीची वेडी माया ....  धृव पद

राखी बांधता भावास , जरी असे तो लहान      
उभा रहातो पाठीशी,   बंधु प्रेम  हे महान         
बालपणी दंगा मस्ती, करी हाच भाऊराया
सय येता माहेराची ,  आठवे तो बंधुराया             1


येता भाऊबीज सण,  धाव घेई भावापाशी
त्याच्या प्रेमळ मायेची , नाही तुलना कोणाशी
तया सम बहिणीची , सदा भावावरी माया
सय येता माहेराची, आठवे तो बंधुराया     2


कृष्ण भाऊ द्रौपदीचा, पहा कसा तिच्या साठी
येता प्रसंग कठीण, राही उभा  सदा पाठी     
बहिणीच्या प्रेमापायी,  पहा तो झिजवी काया
सय येता माहेराची , आठवे तो बंधुराया           3




कोड नं 
RML 227

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...