स्पंदन काव्य स्पर्धा
विषय....वैधव्य
विषय....वैधव्य
काय दोष तिचा । नियतीचा धाव ।
तिला कुठे ठाव । वैधव्याचा ।।
तिला कुठे ठाव । वैधव्याचा ।।
पांढ-या पायाची । तिजला वदती ।
दुस्वास करती । जन्मभर ।।
दुस्वास करती । जन्मभर ।।
वागणूक पण । न देती समान ।
होउनी अजाण । तीजलागी ।।
होउनी अजाण । तीजलागी ।।
किती छळ करी । उठता बसता ।
टोमणे मारता । कष्टी जीणे ।।
टोमणे मारता । कष्टी जीणे ।।
नसे सुख जीवा । जीवनात कष्ट ।
जणू सारे नष्ट । जीवनाते ।।
जणू सारे नष्ट । जीवनाते ।।
वैधव्याचे जीणे । नकोसे वाटते ।
हृदय चिरते । विचारांती ।।
हृदय चिरते । विचारांती ।।
न रहाता कष्टी । आता लढायाचे ।
नाही सहायाचे । जन्मभर ।।
नाही सहायाचे । जन्मभर ।।
काळ बदलला । जगु द्या तिलाही ।
मागणे न काही । तिजसाठी ।।
मागणे न काही । तिजसाठी ।।
वैशाली वर्तक अहमदाबाद
नं. 8141427430
नं. 8141427430
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा