रविवार, ३ नोव्हेंबर, २०१९

चाराक्षरी ...क्षण निरोपाचा

क्षण निरोपाचा
आला दिन
शेवटचा
नोकरीत
निवृत्तीचा

किती वर्षे
केली सेवा
आज त्याचा
मिळे ठेवा

स्मरतात
जुने क्षण
आनंदले
माझे मन

सहकारी
आले आता
हात हाती
घेई जाता

वेळ आता
निरोपाची
सहकारी
सोडण्याची

गुणगान
सुरु झाले
डोळा माझ्या
पाणी आले

उभी झाले
भाषणास
मी निःशब्द
वदण्यास

पूर्ण  झाला
तो सोहळा
आता नाही
गोतावळा

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...