जीवन एक प्रेम कथा आयोजित
काव्य स्पर्धा
विषय दिवाळी
स्पर्धे साठी
ः--शुभ दिपावली ं---
दिपावली असे सण
सर्वांच्याच आवडीचा
आनंदाची उधळण
दावी रूप संस्कृतीचा
येता सण दिवाळीचा
स्नेह ज्योती उजळिल्या
सजलीत घरदारे
दीपमाळा सजविल्या
होता स्वच्छता घरांची
सुरु फराळाची घाई
लाडू चिवडा करण्या
दंग झाल्या ताई -माई
आनंदाच्या प्रकाशात
होते दिवाळी साजरी
मुले बाळे नटलेली
गोड दिसती गोजरी
सुवासिक उटण्याचा
गंध सारा फैलावत
स्नाने अभ्यंग चालती
फटाक्याच्या आवाजात
लक्ष्मी पूजन सोहळा
ओळ लावू पणत्यांची
झुले आकाश कंदील
शान वाढे अंगणाची
प्रतिपदा दिन असे
साडेतीन मुहुर्ताचा
शेवटचा भाऊबीज
बंधु प्रेमाच्या नात्याचा
एक गोष्ट करु नक्की
नको फटाके दुषण
ध्वनी हवेचे रोकून
दूर करु प्रदुषण
अशी असे दिपावली
सर्व सणांची ही राणी
" शुभ दिवाळी "सर्वांना
हीच प्रभो विनवणी.
.......वैशाली वर्तक 31/10/2019
काव्य स्पर्धा
विषय दिवाळी
स्पर्धे साठी
ः--शुभ दिपावली ं---
दिपावली असे सण
सर्वांच्याच आवडीचा
आनंदाची उधळण
दावी रूप संस्कृतीचा
येता सण दिवाळीचा
स्नेह ज्योती उजळिल्या
सजलीत घरदारे
दीपमाळा सजविल्या
होता स्वच्छता घरांची
सुरु फराळाची घाई
लाडू चिवडा करण्या
दंग झाल्या ताई -माई
आनंदाच्या प्रकाशात
होते दिवाळी साजरी
मुले बाळे नटलेली
गोड दिसती गोजरी
सुवासिक उटण्याचा
गंध सारा फैलावत
स्नाने अभ्यंग चालती
फटाक्याच्या आवाजात
लक्ष्मी पूजन सोहळा
ओळ लावू पणत्यांची
झुले आकाश कंदील
शान वाढे अंगणाची
प्रतिपदा दिन असे
साडेतीन मुहुर्ताचा
शेवटचा भाऊबीज
बंधु प्रेमाच्या नात्याचा
एक गोष्ट करु नक्की
नको फटाके दुषण
ध्वनी हवेचे रोकून
दूर करु प्रदुषण
अशी असे दिपावली
सर्व सणांची ही राणी
" शुभ दिवाळी "सर्वांना
हीच प्रभो विनवणी.
.......वैशाली वर्तक 31/10/2019
आभा म सा प पुणे मुंबई प्रदेश अंतर्गत आयोजित
ओढ नात्याची
स्पर्धा क्र 2
विषय - भाऊबीज
*भाऊ माझा दिलदार*
दिपावली असे सण
सर्वांच्याच आवडीचा
आनंदाची उधळण
दावी रूप संस्कृतीचा
सण आहे चैतन्याचा
मांगल्याचा आनंदाचा
नाती बहरुन येता
ओढ लागे भेटण्याचा
बंधुराजा येईल घरी
दारी स्वागता रांगोळी
वाट पाहते भावाची
लावुनिया दीप ओळी
घेई तबक हातात
निरांजन तेजाळून
करी औक्षण भावाचे
ऊर भरे ओवाळून
मुख चंद्र बहिणीचे
मोदे किती उजळले
माया करी आई सम
दोघे मनी आनंदले
प्रेमभावे देई भाऊ
बहिणीस उपहार
लागो न दृष्ट कधी
माझा भाऊ दिलदार
अशी ही भाऊबीज
सण करीती साजरा
अतूट प्रेम बंधनाचा
दोघांचा चेहरा हासरा
वैशाली वर्तक
दिवाळीची चाहुल दिवाळी ची चाहुल
संपताच सण दसरा
दिवाळीची लागे चाहूल
मन रंगे त्या विचारात
पडू लागे तयारीचे पाऊल
घरदारे सारी सजतील
येता समीप दिपावली
येते उत्साहाचे स्फुरण
होता स्वच्छता घरांची
सुरु होई फराळाची घाई
लाडू चिवडा चकली करण्या
दंग होतील ताई -माई
खरेदी ला येईल उत
दुकाने सजून तयार
नवी वस्तू आणण्याची
गृहीणींना हौस फार
पोरांची खाण्याची चंगळ
दिवाळीची मजाच आगळी
किल्ले , दीपमाळा, रांगोळ्या
दिपावलीची शानच वेगळी.
काही करिती मनीं विचार
बाहेरच जाउ दिवाळीत
पण खरी मजा तर असे
घरीच साजरी करण्यात
एक गोष्ट नक्कीच करुया
नको फटाक्यांचे प्रदुषण
ध्वनीचे, हवेचे रोकण्या दुषण
लक्षात घेऊया पर्यावरण.
वैशाली वर्तक (अहमदाबाद) 9/10/2019
भाऊबीज
षडाक्षरी
असे भाऊबीज
अतूट नात्याचा
बहीण भावाच्या
प्रेम जिव्हाळ्याचा 1
दिन भाऊबीज
आनंदिते मन
भाऊ बहिणीचा
दिवाळीत सण 2
येई बंधुराजा
बहिणीच्या घरी
आनंद मावेना
बहिणीच्या उरी 3
उटणे लावूनी
घालते आंघोळ
अंगणी लावली
दीपकाची ओळ 4
औक्षण करते
होण्या औक्षवंत
भाऊराया माझा
होवो भाग्यवंत 5
मुख बहिणीचे
किती उजळले
माया आई सम
दोघे आनंदले 6
सावली प्रकाशन समूह
स्पर्धेसाठी
विषय भाऊबीज
षडाक्षरी रचना
दिलदार भाऊ
असे भाऊबीज
अतूट नात्याचा
बहीण भावाच्या
प्रेम जिव्हाळ्याचा 1
दिन भाऊबीज
आनंदिते मन
भाऊ बहिणीचा
दिवाळीत सण 2
येई बंधुराजा
बहिणीच्या घरी
आनंद मावेना
बहिणीच्या उरी 3
उटणे लावूनी
घालते आंघोळ
अंगणी लावली
दीपकाची ओळ 4
औक्षण करते
होण्या औक्षवंत
भाऊराया माझा
होवो भाग्यवंत 5
मुख बहिणीचे
किती उजळले
माया आई सम
दोघे आनंदले 6
वैशाली वर्तक
अ भा म सा प ठाणे जि. समूह2
आयोजित उपक्रम
विषय - आली माझ्या घरात दिवाळी
काय सांगू किती खुश
घेतले नवीनच घर
पहिली दिवाळी घरात
मन आनंदले क्षणभर
नव्या घराचा आनंद
दिवाळी आली घरी
उजळले सदन प्रकाशाने
मनी आनंदे उर भरी
सजविले लावूनी तोरण
रेखिली अंगणी रांगोळी
आणिले मातीचे दीपक
उजळण्या दीप ओळी
नको प्रदुषण फटाक्यांचे
ध्वनी हवेचे प्रदुषण
राखू सुंदर स्वच्छ परिसर
करु जतन पर्यावरण
फुल माळा सुशोभित
अभ्यंग स्नाने उटण्यानी
गंधित होईल वातावरण
आकाश कंदीलाच्या प्रकाशानी
हौस नवीन कपड्यांची
केलीय पूर्ण बाबांनी
फराळाची ताटे भरली
गप्पागोष्टी त मुले रंगली
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा